आयकर विभागाने करदात्यांना 51531 कोटी केले परत; तुमच्या खात्यात पैसे आले की नाही?
आयकर विभागाने 21,70,134 वैयक्तिक प्रकरणांमध्ये 14,835 कोटी रुपयांचा परतावा जारी केला. दुसरीकडे 1,28,870 कॉर्पोरेट प्रकरणांमध्ये 36,696 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आलाय. CBDT म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने (CBDT) ट्विट करून ही माहिती दिली.
नवी दिल्लीः आयकर विभागाने सुमारे 23 लाख करदात्यांच्या खात्यात 51,531 कोटी रुपये आयटीआर परतावा जारी केलाय. विभागाने चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 एप्रिल 2021 आणि 23 ऑगस्ट 2021 दरम्यान परताव्याचे पैसे जारी केलेत. आयकर विभागाने 21,70,134 वैयक्तिक प्रकरणांमध्ये 14,835 कोटी रुपयांचा परतावा जारी केला. दुसरीकडे 1,28,870 कॉर्पोरेट प्रकरणांमध्ये 36,696 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आलाय. CBDT म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने (CBDT) ट्विट करून ही माहिती दिली.
23 ऑगस्टपर्यंत 2021-22 या आर्थिक वर्षासाठी परतावा म्हणून करदात्यांना 51,531 कोटी जारी करण्यात आलेत. प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, आतापर्यंत मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी दावा केलेल्या रिटर्नच्या 93 टक्के प्रकरणांवर प्रक्रिया केली गेलीय. केवळ गेल्या आठवड्यात 15,269 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जारी करण्यात आलीय, जी लवकरच करदात्यांच्या खात्यात जमा होईल.
तर त्वरित परतावा मिळणार
गेल्या वर्षी म्हणजेच 2020-21 या आर्थिक वर्षात 2.37 कोटींहून अधिक करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपये जारी करण्यात आले, जे 2019-20 च्या आर्थिक वर्षापेक्षा 42 टक्के अधिक होते. विभागाने म्हटले आहे की, कोरोना साथीच्या काळात करदात्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून, त्यांना जलद परतावा देखील समाविष्ट केलाय.
तुम्हाला परतावा मिळाला की नाही असे तपासा
आयकर विभागाने पाठवलेल्या परताव्याची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही विभागाच्या नवीन ई-फायलिंग वेबसाईटला भेट देऊ शकता. येथे लॉगिन केल्यानंतर आयकर परताव्याचा पर्याय दिसेल, जिथे आपण स्थिती तपासू शकता. ज्यांना आतापर्यंत परतावा मिळाला नाही, त्यांच्यासाठी विभागाने एक सल्लाही जारी केलाय.
परतावा न मिळण्याची कारणे काय असू शकतात?
प्राप्तिकर विभागाचे म्हणणे आहे की, विभाग करदात्यांशी संवाद साधण्याच्या प्रक्रियेत आहे, ज्यांना अद्याप मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी परतावा मिळाला नाही. यासाठी करदात्यांचा प्रतिसाद आवश्यक असेल. विभागाच्या म्हणण्यानुसार, बहुतांश घटनांमध्ये, कलम 245 अंतर्गत समायोजन, दोष आणि परतावा अयशस्वी झाल्यामुळे बँक खात्यांची चुकीची जुळवाजुळव होऊ शकते.
मग करदात्यांनी काय करावे?
प्राप्तिकर विभागाने करदात्यांना ऑनलाईन प्रतिसाद देण्याचे आवाहन केलेय, जेणेकरून मूल्यांकन वर्ष 2020-21 च्या अशा प्रकरणांमध्ये लवकरात लवकर आयटीआर क्लिअर करून परतावा जारी केला जाऊ शकतो. सीए अमित कुमार यांनी सांगितले की, जर तुमच्या प्रोफाईलमध्ये आयटीआरची पडताळणी झाली नसेल तर तुम्ही तुमच्या आधारच्या मदतीने पुन्हा पडताळणी करण्याची विनंती पाठवू शकता. किंवा तुम्ही स्वाक्षरी केलेले ITR-V फॉर्म स्पीड पोस्टद्वारे प्राप्तिकर CPC कार्यालयाला पाठवू शकता.
त्यांनी सांगितले की, जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत परताव्याची रक्कम तुमच्या खात्यात येणार नाही. करदाते CPC किंवा मूल्यांकन अधिकारी यांच्याकडे तक्रार याचिका दाखल करू शकतात आणि विभागाला ITR ची प्रक्रिया जलद करण्याची विनंती करू शकतात. विभागाचा दावा आहे की, मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी ITR-1 आणि 4 ची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलीय. परताव्याची रक्कम करदात्याच्या खात्यावर पाठवली जाईल.
संबंधित बातम्या
Gold Rate Today : सोने स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, वाचा सोन्याचे ताजे दर
रेनबॅक्सी सिंह बंधूंच्या जामिनाच्या नावाखाली त्यांच्या पत्नींची 204 कोटींची फसवणूक
Income tax department returns Rs 51,531 crore to taxpayers; Is there money in your account or not?