मुंबई : आयकर विभाग करदात्यांच्या सोयीसाठी आज (सोमवारी 07 जून) नवीन ई-फायलिंग पोर्टल लाँच करणार आहे. www.incometax.gov.in ही आयकर विभागाची नवीन वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आयटीआर दाखल करण्यासह इतर सर्व महत्त्वाची कामं करता येणार आहे. (Income Tax Department to launch new e-filing portal today)
हे नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर करदात्यांना आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ होणार आहे. तसेच यावर सर्व काम जलदगतीने करता येणार आहेत. नवीन ई-फाइलिंग पोर्टलद्वारे करदात्यांना एक आधुनिक आणि अखंड सेवा प्रदान करणे, हे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) उद्दिष्ट आहे.
या पोर्टलमध्ये आयकर विभागाशी संबंधित इतर महत्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे करदात्यांना लवकरच परतावा मिळण्यास मदत होईल. हे पोर्टल लाँच झाल्यानतंर काही दिवसांनी इन्कम टॅक्स विभाग याबाबतचे एक नवे मोबाईल अॅपही सुरु करणार आहे.
ई-फायलिंग पोर्टल करदात्याला आयकर रिटर्न भरण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी, अपील करण्यासाठी आणि त्याचप्रकारे तक्रार नोंदविण्यासाठी, रिफंड आणि अशा बऱ्याच कामासाठी वापरता येणार आहे. आयकर विभागाकडून या पोर्टलचा वापर नोटीस पाठवण्यासाठी, करदात्याकडून उत्तर मिळवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि असेसमेंट, अपील आणि दंड यांच्या निर्णयासाठी केला जातो.
?यात सर्व अपलोड केलेली कागदपत्रे, राहिलेली कामे करदात्याला एकाच डॅश बोर्डवर दिसतील. तसेच सर्व प्रकारचे interactions आणि uploads हे एकाच डॅशबोर्डवर करता येणार आहे. त्यामुळे करदात्यांची प्रक्रिया सुलभ होणार आहे.
?नवीन आयकर पोर्टल हे आयकर रिटर्नच्या प्रोसेसिंग पोर्टलने जोडण्यात येईल. जेणेकरून करदात्याला त्वरित कर परतावा मिळेल.
?आयटीआर भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सॉफ्टवेअर उपलब्ध केले जाईल. करदात्याला आयकराचे ज्ञान नसताना आयकर भरण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून आधीच भरलेला डेटा सॉफ्टवेअरमध्ये असेल, जेणेकरून कमीत कमी डेटा भरावा लागेल.
?पगार, घर मालमत्ता किंवा व्यवसायासह उत्पन्नाचा तपशील भरताना कोणताही करदाता त्यांचे प्रोफाईल सक्रियपणे अपडेट करता येणार आहे. त्याचा उपयोग आयटीआर दाखल करण्यासाठी केला जाईल.
?टीडीएस आणि एसएफटी तपशील अपलोड झाल्यानंतर पगाराचे उत्पन्न, व्याज, लाभांश आणि भांडवली नफ्यासह प्री-फिलिंगची क्षमता उपलब्ध असेल.
?करदात्याच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नवीन कॉल सेंटर देखील सुरू केले जाणार आहे. करदात्यांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न, उपयोगकर्ता नियमावली, व्हिडीओ यासारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच इतर काही समस्या असल्यास चॅटबॉट आणि लाईव्ह एजंटशी बोलण्याची सुविधा देखील मिळेल.
(Income Tax Department to launch new e-filing portal today)
संबंधित बातम्या :
SBI, HDFC, ICICI : 30 जूनची डेडलाईन लक्षात ठेवा, अन्यथा FD अधिक लाभांश नाही मिळणार
मे महिन्यात जीएसटीमध्ये 65 टक्के वाढ, जाणून घ्या सरकारी तिजोरीत किती रक्कम आली
केवळ 250 रुपयात सुरु करा पोस्टात खाते, काही वर्षांनी मिळतील 66 लाख, नेमकी योजना काय?