Income Tax filing: कर भरताना चुकीचा ITR फॉर्म भरल्यास काय होणार?, जाणून घ्या

आयकर विभागाने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 7 आयटीआर फॉर्म अधिसूचित केलेत. हे फॉर्म सहज (ITR-1), फॉर्म ITR-2, फॉर्म ITR-3, फॉर्म सुगम (ITR-4), फॉर्म ITR-5, फॉर्म ITR-6 आणि फॉर्म ITR-7 आहेत.

Income Tax filing: कर भरताना चुकीचा ITR फॉर्म भरल्यास काय होणार?, जाणून घ्या
तुम्ही दोन घरांचे मालक आहात का? आयकरात सूट मिळवण्यासाठी हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 7:54 AM

नवी दिल्लीः आयकर भरताना एखाद्याला आपले उत्पन्न आणि कर दायित्वाच्या आधारावर योग्य आयकर रिटर्न फॉर्म निवडावा लागतो. चुकीचा फॉर्म निवडणे म्हणजे करदाता म्हणून तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आयकर विभागाने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 7 आयटीआर फॉर्म अधिसूचित केलेत. हे फॉर्म सहज (ITR-1), फॉर्म ITR-2, फॉर्म ITR-3, फॉर्म सुगम (ITR-4), फॉर्म ITR-5, फॉर्म ITR-6 आणि फॉर्म ITR-7 आहेत.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हे फॉर्म तयार

कर विभागाने जारी केलेल्या प्रत्येक फॉर्मचे स्वतःचे महत्त्व आहे. हे करदात्याचे उत्पन्न, मालमत्ता, दायित्वे, परदेशी मालमत्ता इत्यादींवर अवलंबून असते, त्यांना कोणता फॉर्म भरायचा आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हे फॉर्म तयार करण्यात आलेत.

चुकीचा आयटीआर फॉर्म भरल्यानंतर काय होते?

करदात्याकडून चुकीचा आयटीआर फॉर्म भरला गेल्यास करतज्ज्ञ अशा रिटर्नला सदोष म्हणून घोषित करू शकतात. ही तरतूद आयकर कायद्याच्या कलम 139 (9) अंतर्गत करण्यात आलीय. त्यांचे म्हणणे आहे की, करदात्यांना अशा विसंगतींविषयी कर कार्यालयाद्वारे माहिती दिली जाऊ शकते. यानंतर करदात्यांना ते 15 दिवसांच्या आत दुरुस्त करावे लागेल आणि नंतर ते योग्य ITR सह सुधारित रिटर्न दाखल करू शकतात.

नोटीसनंतर त्रुटी सुधारली नाही तर काय?

जर करदात्यांनी 15 दिवसांच्या आत ती दुरुस्त केली नाही, तर त्यांनी दाखल केलेले आयकर विवरणपत्र अवैध मानले जाईल. यानंतर अशा करदात्यांना आयटीआर न भरल्याबद्दल दंडदेखील भरावा लागू शकतो. या व्यतिरिक्त आयकर कायद्याच्या कलम 234A अंतर्गत व्याज देखील भरावे लागेल.

चुकीच्या माहितीसाठी दंडही भरावा लागू शकतो

काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये असे देखील होऊ शकते की, करदात्यांनी चुकीचा फॉर्म भरल्यानंतर करदात्याचा परतावा योग्य असल्याने तो वैध मानला जातो. मात्र, अशा करदात्यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल दंडही भरावा लागू शकतो. उदाहरणार्थ, समजा पगारदार व्यक्तीने आयटीआर -1 फॉर्म भरला आहे. परंतु त्यांच्याकडे परदेशी मालमत्ता आहे, जे ते या स्वरूपात दाखवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत परदेशी मालमत्तेची माहिती न दिल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते.

संबंधित बातम्या

अल्पावधीत मोठा नफा हवा असल्यास ‘या’ 5 फंडांमध्ये पैसे गुंतवा, जबरदस्त परतावा उपलब्ध

पेन्शनबाबत मोठी बातमी; सरकार मुलांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नियमांमध्ये बदल होणार

Income Tax filing: Find out what happens if you fill out the wrong ITR form while paying taxes

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.