राजस्थानात आयटीची सर्वात मोठी रेड, तळघरात सापडला कुबेराचा खजिना; 700 कोटी जप्त!
आयकर विभागानं जयपूरमधील तीन उद्योगसमुंहावर राज्यस्थानातील सर्वात मोठा छापा टाकला आहे. (Income Tax raid Jaipur)

जयपूर: राजस्थानात आयकर विभागाने सर्वात मोठा छापा टाकून कुबेराचा खजिनाच शोधून काढला आहे. आयकर विभागाने जयपूरमध्ये सराफा व्यापारी, दोन रियल इस्टेट डेव्हल्परच्या कार्यालय आणि घरी धाडी मारून पावणे दोन हजार कोटी रुपये जप्त केले आहेत. एका सराफा व्यापाऱ्याच्या घरात तर तळघर सापडले असून त्यात 700 कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.(Income tax raid in Jaipur three groups named Gopal Kripa Group, Silver Art Group and Choradia Group)
सराफ व्यावसायिकाडे 700 कोटींची सपंत्ती
आयकर विभागाने राजस्थानाच्या इतिहासातील सर्वात मोठी रेड टाकून हा कुबेराचा खजिना शोधून काढला आहे. आयकर विभागानं टाकेलल्या छाप्यांची कारवाई सलग 5 दिवस सुरु होती. आयकर विभागानं सराफ व्यावसायिकाच्या कार्यालयांवर आणि घरी छापे टाकले. या छाप्यांमध्ये सराफ व्यावसायिकाकडे तळघर मिळाले. यामध्ये 700 कोटींची संपत्ती असल्याची माहिती आहे.
आयकर विभागाची कारवाई 5 दिवस
राजस्थानाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. आयकर विभागाच्या या कारवाईत 50 टीम सहभागी झाल्या होत्या. एका टीममध्ये 4 सदस्य असे एकूण 200 कर्मचारी कार्यरत होते. 5 दिवस चाललेल्या कारवाईत हजारो कागदपत्रं आणि दस्त तपासण्यात आले.
आयकर विभागाच्या माहितीनुसार हे छापे जयपूरमधील तीन मोठ्या समुहांवर टाकण्यात आले. सिल्वर आर्टग्रुप, चोराडिया ग्रुप आणि गोकुल कृपा ग्रुपच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या छाप्यामध्ये 1700 ते 1750 कोटी रुपयांच्या काळा पैशाच्या कमाईचा भांडाफोड झाला आहे.
सराफाच्या कार्यालयांवर छापा टाकण्यात आला. तिथे एका ठिकाणी तळघर आढळून आले. त्यामध्ये मूर्ती, किमती खडे, दागिने सापडले, त्याची किमंत अंदाजे 700 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार तीन उद्योगांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यामध्ये 200 कोटींच्या व्यवहारांची कागदपत्रं आढळून आली आहेत. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील जप्त करण्यात आलं आहे. आयकर विभागाच्या 50 टीम्सनं केलेल्या कारवाईत सापडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.
Special Report : नंदिग्राम ममता बॅनर्जींसाठी गेमचेंजर ठरणार?https://t.co/ka3iv1C5Dh#WestBengalElection2021 | #nandigram | #TMCvsBJP | #MamataBanerjee | #SuvenduAdhikari | #amitshahinbengal
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 23, 2021
संबंधित बातम्या:
मोठी बातमी जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत, RBI ने दिली माहिती!
Bad Bank काय आहे? बँकिंग क्षेत्रातील सुधारणेसाठी अर्थसंकल्पात याची घोषणा होण्याची शक्यता का?
(Income tax raid in Jaipur three groups named Gopal Kripa Group, Silver Art Group and Choradia Group)