Income tax Refund नाही आला? तात्काळ चेक करा ‘ही’ माहिती, वाचा सविस्तर

कर परतावा मिळालेल्यांमध्ये तुमचं नाव नसेल तर घाबरू नका.

Income tax Refund नाही आला? तात्काळ चेक करा 'ही' माहिती, वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 3:04 PM

मुंबई : इनकम टॅक्स विभागाने (Income tax department) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2020 ते 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत विभागाने सुमारे 1.95 कोटींचा कर परतावा जारी केला आहे. यामधून 69,653 कोटी कर परतावा वैयक्तिक करदात्यांना (Taxpayers) मिळाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण, कर परतावा मिळालेल्यांमध्ये तुमचं नाव नसेल तर घाबरू नका. (income tax refund process how to check you itr refund and notice)

लॉकडाऊनमध्ये आयकर विभागही कमी क्षमतेनं काम करत आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला उशिरा पैसे मिळतील. पगाराव्यतिरिक्त भांडवली नफा, व्यावसायिक उत्पन्न आणि तोटा समायोजित झाल्यास करदात्यांची प्रतीक्षा जास्त असू शकते.

परतावा मिळण्यास होऊ शकतो उशिर…

CA कपिल मित्तल पार्टनर व्हीजेएम अँड असोसिएट्सने दिलेल्या माहितीनुसार, लोकांची एक मोठी चूक म्हणजे त्यांनी बँकेचे तपशील चुकीच्या पद्धतीने भरले किंवा जुन्या खात्याची माहिती दिली नसेल. प्रत्येक करदात्याने बँक तपशील चेक करणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं खातं आधारशी जोडलं जाणंही महत्त्वाचं आहे. यासंबंधी तुम्हाला आयकर विभागाकडून ईमेल आल्यास त्याला तत्काळ उत्तर द्या. यासाठी तुमचा चालू ईमेल आयडीही शेअर करा.

या कर्मचाऱ्यांना कर लागू होणार नाही

पीएफच्या नव्या नियमानुसार, वर्षाला 2.5 लाखांपर्यंत जमा असलेल्या योगदानावर कोणताही कर आकारला जाणार नाही. परंतु पीएफ खात्यात 2.5 लाखांहून अधिक रक्कम जमा असल्यास त्यावर कर आकारला जाणार आहे. पण नेमका कर किती आकारला जाणार हे अद्यापही अस्पष्ट आहे. सध्याच्या नियमानुसार कंपनी आणि आपल्या पगारातून जवळपास 12 टक्के पैसे पीएफ खात्यात जमा केले जातात. सध्या यावर कुठलाही कर लागत नाही. परंतु नव्या नियमानुसार, उच्च उत्पन्न असणाऱ्यांना हा कर भरावा लागणार आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना या नियमाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

हे आहेत IT विभागाचे अधिकृत आयडी

दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात फसवणूकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामुळे अनेक लोक ई-मेल मिळाल्यानंतरही त्यावर उत्तर देत नाही आहेत. यासाठी आयकर विभागाकडून काही अधिकृत ई-मेलची यादी जारी करण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला खरंच आयकर विभागाचा मेल आला आहे की फसवणुकीचा आहे हे शोधणं सोपं जाईल. यासाठी आयकर विभागाने खालीलप्रमाणे अधिकृत ई-मेल आयडीची यादी जाहीर केली आहे.

– @incometax.gov.in – @incometaxindiaefiling.gov.in – @tdscpc.gov.in – @cpc.gov.in – @insight.gov.in – @nsdl.co.in – @utiitsl.com (income tax refund process how to check you itr refund and notice)

संबंधित बातम्या – 

Gold/Silver Rate Today: आज पुन्हा घसरले सोन्या-चांदीचे भाव, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

आता घर बसल्या PF अकाऊंट ऑनलाईन करा ट्रान्सफर, EPFO ने सांगितली संपूर्ण प्रोसेस

घरी बसल्या दिवसाला करू शकता बक्कळ कमाई, तुमच्यासाठी खास 8 बिझनेस आयडिया

Gold Prices Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव घसरले, चांदी वधारली; वाचे ताजे भाव

(income tax refund process how to check you itr refund and notice)

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.