नवी दिल्ली: कोरोनामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालं. आता कुठे आर्थिक व्यवस्था रुळावर येत आहे. अशावेळी आयकर भरण्याच्या कामात वेळ गेल्यास आणखी नुकसान होऊ शकतं, असं कारण देत देशातील उद्योजकांनी आयकर भरण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवावी, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे केली आहे. येत्या 31 डिसेंबर 2020 रोजी आयकर भरण्याची अंतिम मुदत असल्याने 7 कोटी उद्योजकांची संघटना असलेल्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) ही मागणी केली आहे. (income tax return date should extended by 3 months)
31 डिसेंबर 2020 रोजी आयकर भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत आयकर भरण्यासाठी सरकारकडून आवाहन केलं जात आहे. या शिवाय रोज किती करदात्यांनी आयकर भरलाय त्याची माहितीही शेअर केली जात आहे.
एवढ्या करदात्यांनी भरला कर
आयकर विभागाने केलेल्या ट्विटनुसार 25 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5 लाख 82 हजार 988 करदात्यांनी आयकर भरला आहे. 24 डिसेंबरपर्यंत 3.97 कोटी करदात्यांनी कर भरला आहे. यातील 2.27 कोटी करदात्यांनी आयटीआर-1 फॉर्म भरला आहे. ITR-1ला ‘सहज’च्या नावाने ओळखले जातं आतापर्यंत 85.20 लाख करदात्यांनी ITR-4 फॉर्म भरला आहे. त्याला ‘सुगम’ नावानेही संबोधले जाते.
जीएसटीची समीक्षा व्हावी
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि कॅटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी निर्मला सीतारामण यांना पत्रं लिहिलं आहे. त्यात त्यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन जीएसटीवर पुनर्विचार करण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. जीएसटी प्रणालीची समीक्षा करतानाच ही प्रणाली आणखी सोपी करण्यावरही विचार झाला पाहिजे. तसेच या प्रणालीची व्याप्ती कशी वाढवता येईल तसेच केंद्र आणि राज्याच्या महसुलात वाढ कशी होईल, याचाही विचार केला गेला पाहिजे, असं सांगत कॅटच्या अध्यक्षांनी सीतारामण यांची या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे. (income tax return date should extended by 3 months)
VIDEO: TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 PM | 25 December 2020https://t.co/AwLQs7N6jl#Top9News #NewsBulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
संबंधित बातम्या:
RTGS आणि NEFTद्वारे पैसे ट्रान्सफर करताय? मग या 8 गोष्टी माहीतच हव्यात!
बँक खात्यात निगेटिव्ह बॅलन्स आहे? जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम
शेवटच्या क्षणी ITR फाईल करताय? स्टेट्स जाणून घेण्यासाठी सोप्या टिप्स
(income tax return date should extended by 3 months)