Income Tax Return Filing : आतापर्यंत 4.43 कोटींपेक्षा अधिक आयकर रिटर्न दाखल
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 साठी 25 डिसेंबरपर्यंत एकूण 4.43 कोटींपेक्षा अधिक आयकर रिटर्न दाखल झाले आहेत. ज्यामध्ये शनिवारी भरलेल्या 11.68 लाख आटीआरचा समावेश आहे.
नवी दिल्ली : Income Tax Return (ITR) Filing आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 साठी 25 डिसेंबरपर्यंत एकूण 4.43 कोटींपेक्षा अधिक आयकर रिटर्न दाखल झाले आहेत. ज्यामध्ये शनिवारी भरलेल्या 11.68 लाख आयकर रिटर्नचा समावेश आहे. आयाकर विभागाकडून ट्विट करत ही माहिती जारी करण्यात आली आहे. दरम्यान आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर असून, त्यापूर्वी आपले आयकर रिटर्न दाखल करावेत असे आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आले आहे.
इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्यास मुदतवाढ
इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची सर्वसाधारण मुदत ही जुलैपर्यंत असते. मात्र गेल्या वर्षी देशावर कोरोनाचे सावट होते. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सरकारने इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. ही मुदत संप्टेबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र इनकम टॅक्स दाखल करण्यासाठी असलेल्या पोर्टलमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या, पोर्टलमध्ये निर्माण झालेल्या समस्यांमुळे इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी करदात्यांना अनेक अडचणींचा सामना कारावा लागत होता. त्यामुळे पुन्हा एकदा इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. आयकर रिटर्न दाखल करण्याची मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
इनकम टॅक्सला कोरोनाचे ग्रहण
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षासाठी आतापर्यंत एकूण 4,43,17,697 जणांनी आयकर रिटर्न दाखल केले आहेत. 31 डिसेंबरची तारीख जशी जवळ येत आहे, तशी आयटीआर दाखल करणाऱ्यांच्या संख्येत देखील मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. मात्र 2020-21 या वर्षामध्ये आयटीआर दाखल करणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. कोरोनामध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला असून, अनेकांचे रोजगार देखील गेले आहेत. त्यामुळे यंदा आयकर रिटर्न दाखल करणाऱ्यांची संख्या घटल्याची माहिती इनकम टॅक्स विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
31 डिसेंबरच्या आत पूर्ण करा ‘ही’ कामे; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
पोस्टाच्या ‘आरडी’ योजनेतून मिळवा अधिक नफा, ‘अशी’ करा गुंतवणूक