Income Tax Return भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस, आयकर विभागाची ‘झटपट प्रोसेसिंग’ सुविधा

31 डिसेंबर ही आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आहे. यामुळं आयकर विभागानं 'झटपट प्रोसेसिंग' ही सुविधा सुरु केली आहे. (Income Tax return Jhatpat Processing)

Income Tax Return भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस, आयकर विभागाची 'झटपट प्रोसेसिंग' सुविधा
आयकर विभागानं झटपट प्रोसेसिंग सुविधा सुरु केलीय
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 3:35 PM

नवी दिल्ली: आयकर रिटर्न भरण्यासाठी अवघे पाच दिवस राहिले आहेत. 31 डिसेंबर ही आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आहे. यामुळं आयकर विभागानं ‘झटपट प्रोसेसिंग‘ ही सुविधा सुरु केली आहे. तुम्ही जर आतापर्यंत आयकर रिटर्न भरला नसेल तर नव्या सुविधेचा वापर करुन लवकर आयकर रिटर्न भरा. अन्यथा दंड भरावा लागणार आहे. पगारदारांसाठी ही खास सुविधा सुरु करण्यात आली आहे. चार्टर्ड अकाऊंटंट चंद्रकांत मिश्रा यांच्या माहितीनुसार पगारदारासांठी आयकर भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. जे पगारदार आयकर भरणार नाहीत त्यांना 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. (Income Tax return IT department start new service Jhatpat processing for return filing)

झटपट प्रोसेसिंग

झटपट प्रोसेसिंग सुविधा वापरुन तुम्ही आयकर रिटर्न भरु शकता. आयकर विभागाच्या वेबसाइट या सुविधेसाठी ‘फाइल करो झट से, प्रोसेसिंग होगी पट से’ हे स्लोगन पाहाला मिळेल. या सुविधेद्वारे आयटीआर-1 आणि आयटीआर-4 भरता येणार आहे.

आयटीआर 1 आणि आयटीआर 4 चे महत्व

आयटीआर 1 फार्मद्वारे ज्यांना 50 लाखांपर्यंतचं उत्पन्न पगार, पेन्शन आणि स्थावर मालमत्तेमधून मिळते त्यांच्यासाठी आहे. आयटीआर 4 हा व्यावसायिकांच्यासाठी आहे. यामध्ये आयकर कायद्याच्या सेक्शन 44 एडी, 44 एडीए आणि 44 एईच्यानुसार उत्पन्न असलेल्यांना आयटीआर4 फॉर्म भरावा लागतो.

चंद्रकांत मिश्रा यांनी जे पगारदार आहेत आणि त्यांच्या उत्पन्नांचं ऑडिट होत नाही त्यांच्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असल्याचं सांगितले. तर, जे पगारदार व्यावसायांशी निगडित आहेत आणि त्यांच्या ताळेबंदाचे ऑडिट होते त्यांच्यासाठी 31 जानेवारी 2021 अंतिम तारीख असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली. आयकर रिटर्न न भरणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा दंड असल्याचंही त्यांनी सांगितले.

10,000 रुपयांपर्यंत दंड

चार्टर्ड अकाऊंटंट मिश्रा यांनी ज्या व्यक्तींचं कर योग्य उत्पन्न 50 हजार ते 5 लाखांपर्यंत आहे. त्यांना 31 डिसेंबरनंतर रिटर्न भरल्यास 1 हजार रुपये दंड भरावा लागेल, असं सांगितले आहे. ज्यांचे कर योग्य उत्पन्न 5 लाखांहून अधिक आहे. त्यांना 31 डिसेंबर नंतर रिटर्न भरायचा असल्यास 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. सन 2019-20 या वर्षातील प्राप्तिकर भरण्यासाठी या तरतुदी आहेत. दंड भरुन आयकर भरण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2021 आहे. मात्र, दंड भरण्यापासून सुटका करुन घ्यायची असेल तर 31 डिसेंबरपूर्वीच रिटर्न भरुन आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

आयकर भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत द्या; उद्योजकांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

शेवटच्या क्षणी ITR फाईल करताय? स्टेट्स जाणून घेण्यासाठी सोप्या टिप्स

(Income Tax return IT department start new service Jhatpat processing for return filing)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.