AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax Return : उत्पन्न कितीही असू द्या पण आयटीआर भराच; जाणून घ्या आयटीआर भरण्याचे फायदे

नियमानुसार ज्यांचे उत्पन्न (Income) ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक असते त्यांनी ITR भरणे अनिवार्य आहे. सध्या ही मर्यादा अडीच लाख रुपये असून काही विशेष तरतुदीनुसार हे उत्पन्न पाच लाख रुपये आहे.

Income Tax Return : उत्पन्न कितीही असू द्या पण आयटीआर भराच; जाणून घ्या आयटीआर भरण्याचे फायदे
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 12:40 PM

सोनियाचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाख लाख रुपये आहे. परंतु आता ITR भरावा की नाही यामुळे तीचा गोंधळ उडाला आहे. हा गोंधळ केवळ सोनियाचा नसून ITR च्या बाबतीत संभ्रमात असणारे अनेक जण आहेत. नियमानुसार ज्यांचे उत्पन्न (Income) ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक असते त्यांनी ITR भरणे अनिवार्य आहे. सध्या ही मर्यादा अडीच लाख रुपये असून काही विशेष तरतुदीनुसार हे उत्पन्न पाच लाख रुपये आहे. त्यामुळे अनेक जण आयटीआर (ITR) भरणे गरजेचे नाही असे मानतात. परंतु असे नसून आयटीआर सर्वांनीच भरणे गरजेचे आहे. तुमच्या करियरची नुकतीच सुरुवात झाली असेल किंवा भविष्यात घर, कार ,शैक्षणिक कर्ज (Education loan) घ्यायचे असेल आणि तुमचे उत्पन्न करपात्र असेल वा नसेल तरीही ITR भरणे गरजेचे आहे.यामुळे कोणतेही नुकसान होणार नसून फायदेच होणार आहेत.

वार्षिक उत्पन्नाचा पुरावा

जे लोक ITR भरतात त्यांना आयकर विभागाकडून एक प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्रामुळे तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे हे समजते व्यावसायिक किंवा नोकरदारांचे उत्पन्न लाखो रुपयांमध्ये असेल आणि त्याने जर ITR भरला तरच त्याचे उत्पन्न अधिकृत मानले जाईल. आजकाल बरेच लोक घर, कार, एसी, फ्रीज या वस्तू बॅंका किंवा इतर संस्थांकडून कर्ज घेऊन खरेदी करतात. परंतु बॅंका किंवा इतर संस्था कर्ज त्यांनाच देतात ज्यांच्याकडे कर्ज परत फेडण्याची क्षमता असते. ITR हे तुमचे वार्षिक उत्पन्नाचे एक सरकारी कागदपत्र आहे, जे बँक किंवा संस्था तुमचे उत्पन्नपत्र म्हणून स्वीकारतात. जर तुम्ही नियमित ITR फाइल करत असाल तर कर्ज मिळणे सहज शक्य होते.

विमा कव्हर आणि क्लेम

कोरोनामुळे जीवनाचे महत्व सर्वांनाच समजले आहे. त्यामुळे बरे वाईट काही झाले तर नातलगांना इतर कोणासमोर हात पसरायला लागू नये यासाठी टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून विमा कव्हर वाढवला जात आहे. जर मोठ्या रकमेचा टर्म इन्शुरन्स घेऊ इच्छित असाल तर विमा कंपनीकडून उत्पन्नाचा तपशील मागितला जातो. यासाठी ITR हा महत्वाचा पुरावा आहे. यामध्ये जर व्यक्तीचा दुर्घटनेत मृत्यू झाला आणि कुटुंबासाठी प्रकरण कोर्टात गेले तर मृताच्या गेल्या 3 वर्षाच्या ITR च्या आधारे वार्षिक सरासरी उत्पन्न ठरवले जाते. या आधारे कुटुंबाला 10 पट अधिक कव्हर मिळू शकते.जर व्यक्तीचे उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर कुटुंबाच्या पालन पोषणासाठी कोर्टाकडून 1 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. जर आयटीआर नसेल तर केवळ एक-दोन लाख रुपयांपर्यंतच पैसे मिळतात.

हे सुद्धा वाचा

उद्योग उभारणीसाठी आयटीआर आवश्यक

वाढत्या बेरोजगारीमुळे सरकारी किंवा खासगी नोकरी मिळणे अशक्य आहे. यामुळे मोठ्या संख्येने लोक स्वतःचे उद्योग उभारत आहेत. यासाठी ITR भरणे गरजेचे आहे. कोणत्याही सरकारी विभागाकडून कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे असल्यास ITR ची मागणी केली जाते, असे आर्थिक सल्लागार जितेंद्र सोलंकी सांगतात.प्रॉपर्टीचे व्यवहार किंवा गुंतवणूक केल्यास आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. पण जर नियमित ITR भरला असेल तर काळजीचे काही कारण नसते.जर तुम्ही ITR च्या कक्षेत येत नसाल परंतु ITR भरत असाल तर भविष्यात नुकसान नाही तर फायदाच होऊ शकतो. तसेच परदेशी जाण्याचा विचार करत असाल तर व्हिसा साठी ITR मागितला जातो. जर तुम्ही पैशाचे मोठे व्यवहार करत असाल तर ITR मुळे फायदा होऊ शकतो.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.