Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO | टीडीएस जमा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढता येते? काय आहे नवीन नियम?

1 एप्रिल पासून भविष्य निर्वाह निधी योजनेवर करासंबंधी नवीन नियम लागू होत आहेत. नवीन नियमानुसार 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त पीएफ जमा असेल तर व्याजावर कर भरावा लागणार आहे.

EPFO | टीडीएस जमा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढता येते? काय आहे नवीन नियम?
ईपीएफओImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 9:24 AM

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना (Employees Provident Fund) ही सेवानिवृत्तीनंतरची योजना आहे. सेवा बजावल्यानंतर 60 वर्षांच्या व्यक्ती यामधून त्यांची रक्कम काढू शकतात. अर्थात कर्मचा-याला गरजेनुसार, विहित कारणांसह आगाऊ रक्कम काढता येते. या योजनेतून म्हणजेच ईपीएफमधून (EPF) रक्कम काढण्यासंबंधी विविध नियम आहेत. तर चला जाणून घेऊयात भविष्य निर्वाह निधीतून (Provident Fund) रक्कम काढल्यास किती कर आकारला जातो, किती वर्षांनी कर आकारण्यात येत नाही आणि जर हा कर वसूल होत असेल तर तो उत्पन्नांवर आधारीत कर (TDS) स्वरुपात आकारण्यात येतो का याची माहिती घेऊयात. 1 एप्रिल पासून भविष्य निर्वाह निधी योजनेवर करासंबंधी नवीन नियम लागू होत आहेत. नवीन नियमानुसार 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त पीएफ जमा असेल तर व्याजावर कर भरावा लागणार आहे.

सध्या या आर्थिक वर्षात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत 8.5 टक्के व्याज मिळत आहे. प्रोव्हिडंट फंडमध्ये जमा राशीवर कलम 80 सी अंतर्गत कर वजावटीचा लाभ मिळतो. यावरील वार्षिक व्याज कर मुक्त आहे. आणि हा पूर्ण कालावधीवरही कसले व्याज आकारण्यात येत नाही.

कराविषयीचे नवीन नियम काय आहेत?

  1. जर ईपीएफमधील रक्कमेला पाच वर्षांआधीच हात घातला तर त्यावर कर लागतो. पण पाच वर्षानंतर रक्कम काढल्यास त्यावर कर आकारण्यात येत नाही. पीएफमधून रक्कम काढल्यास उत्पन्नांवर आधारीत कर (Tax deduction on Source) कपात करण्यात येते.
  2. करासाठी पाच वर्षांचा कालावधी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही एखाद्या कंपनीत 1 वर्षासाठी प्रशिक्षण पूर्ण करत होता, त्यावेळी सहाजिकच तुम्ही त्या कंपनीचे कायमस्वरुपी कर्मचारी नव्हता. त्यानंतर पुढील चार वर्षे तुम्ही कंपनीचे कायमस्वरुपी(Payroll Employ) होता. अशावेळी कर्मचारी ईपीएफमधील रक्कम काढणार असेल तर त्या रक्कमेवर टीडीएस आकारण्यात येईल. कारण कंपनीचे कायमस्वरुपी कर्मचारी म्हणून तुम्ही केवळ चार वर्षे काम केलेले आहे, पाच वर्षे पूर्ण केलेली नाही. त्याचा फटका तुम्हाला कर स्वरुपात मिळेल.
  3. पाच वर्षांपूर्वी 50 हजारांहून कमी रक्कम काढण्यात येत असेल तर त्यावर टीडीएस लागणार नाही. पण इनकम टॅक्स रिटर्न भरताना याची माहिती द्यावी लागेल. 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यात येणार असेल तर त्यावर 10 टक्के टीडीएस कपात करण्यात येईल. पॅनकार्ड अद्ययावत केलेले नसेल तर 30 टक्के टीडीएस कपात करण्यात येईल. फॉर्म 15 G/ 15 H जमा केल्यास टीटीएस कपात होणार नाही. पाच वर्षानंतर रक्कम काढल्यास त्यावर कुठलीही कर कपात करण्यात येणार नाही.
  4. मानविय दृष्टिकोनातून कर्मचा-याला काही परिस्थिती रक्कम काढताना कर आकारण्यात येत नाही. कर्मचा-याची तब्येत नाजूक असेल त्याला उपचारांसाठी रक्कमेची गरज असेल तसेच ज्या कंपनीत कर्मचारी काम करत आहे, तीच बंद झाली तर कर्मचा-याला रक्कम काढताना टीडीएस आकारण्यात येत नाही.
  5. ईपीएफचे तीन प्रमुख भाग आहेत. पहिले योगदान कंपनी, मालक, शेठ यांच्याकडून मिळते. दुसरे योगदान पीएम जमा रक्कमेवर जे व्याज देते ते आणि तिसरा भाग अर्थात कर्मचा-याकडून घेण्यात येते. त्यावरील व्याजाचाही यामध्ये समावेश होतो.

संबंधित बातम्या :

EPFO योजना : खासगी नोकरदारांनाही पेन्शनचा लाभ, महिना 15-30 हजार पेन्शन

Family Pension : ‘यांनाही’ मिळणार फॅमेली पेन्शनचा फायदा, केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय

6 कोटी पीएफ खातेधारकांचा ताण मिटला; पुन्हा काढता येणार कोविड ॲडव्हान्स रक्कम