कर बचतीसाठी दोन दिवस, जेरोधाच्या नितिन कामथ यांनी सांगितली आयडिया
Tax Saving Tips: नितीन कामथ यांनी म्हटले आहे की, तुम्ही जर हिंदू असाल आणि लग्न झाले असेल तर तुम्ही कर बचतीसाठी HUF चा वापर करु शकतात. हा कर बचतीसाठी वेगळा पर्याय आहे. सर्व कर बचतीचे पर्याय वापल्यावर HUF मध्ये कर बचत वेगळी ठरणार आहे.
आयकर वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन आयकर वाचवता येतात. त्यासाठी गृहकर्ज, पीपीएफ, विमा, म्युच्युअल फंड, वैद्यकीय विमा, पेन्शन प्लॅन, शासकीय बॉन्ड, मुलांची शैक्षणिक शुल्क असे विविध प्रकार आहेत. या आर्थिक वर्षांत करबचतीसाठी 31 मार्चपर्यंत विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन बचत करता येते. जेरोधाच्या नितिन कामथ यांनी कर बचतीसाठी आणखी एक आयडिया सांगितली आहे. त्यांनीही सोशल मडियावर ट्विट करुन कर बचतीचा हा मार्ग सांगितला आहे.
नितीन कामथ यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) च्या फायद्यांबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती खूप कमी लोकांना माहिती आहे. ते म्हणाले की, एचयूएफ विवाहित हिंदूंना कर बचतीसाठी आणखी एक पर्याय आहे. जर तुम्ही विवाहित आणि हिंदू असाल, तर तुम्ही तुमच्या करांची योजना आणि बचत करण्यासाठी HUF वापरू शकता. HUF एक वेगळा पर्याय आहे. हा पर्याय कर बचतीच्या इतर मार्गांपेक्षा वेगळा आहे. गुंतवणुकीचे इतर सर्व पर्याय वापल्यानंतरही स्वतंत्रपणे हा पर्याय वापरता येतो.
नितीन कामथ म्हणाले की, जर तुम्ही भाड्याची रक्कम HUF मध्ये हस्तांतरित करणे, HUF च्या नावाने डिमॅट खाते उघडणे, HUF बँक खात्यात पैसे हस्तांतरित करणे आणि भेटवस्तू स्वीकारणे यासारख्या गोष्टींवर देऊन कर वाचवू शकतात.
A friend was asking me about taxation for Hindu Undivided Families (HUF).
If you're married and a Hindu, you can use a HUF to plan and save your taxes. HUF is treated as a separate entity, so all these deductions will apply separately to HUF along with the individual…
— Nithin Kamath (@Nithin0dha) March 27, 2024
HUF वर कर बचतीचा फायदा
नितीन कामथ यांनी म्हटले आहे की, तुम्ही जर हिंदू असाल आणि लग्न झाले असेल तर तुम्ही कर बचतीसाठी HUF चा वापर करु शकतात. हा कर बचतीसाठी वेगळा पर्याय आहे. सर्व कर बचतीचे पर्याय वापल्यावर HUF मध्ये कर बचत वेगळी ठरणार आहे. जर तुम्हाला घरभाड्यात मिळालेली रक्कम ट्रन्सफर केली, HUF च्या नावाने डिमॅट खाते उघडून किंवा HUF च्या बँक खात्यात वर्ग केली किंवा गिफ्ट म्हणून दिली तरी तुम्हाला कर बचतीचा फायदा मिळणार आहे.
हा आहे नियम
एचयूएफ आयकर अधिनियम, 1961 नुसार वेगळा पर्याय आहे. हा पर्याय आपला वेगळे खाते (पॅन) करतो. त्याचे स्वतंत्र टॅक्स रिर्टन दाखल करता येते. या प्रकारात एक पत्नी आणि मुले सहभागी करता येतात. परिवाराचा मुख्य व्यक्तीच्या नावाने हे खाते होते. तर इतर जण सहसदस्य असतात. कर बचतीसाठी कमीत कमी दोन जण सहयोगी सदस्य असले पाहिजे. विवाहित मुली आपल्या वडिलांबरोबर आणि पतीबरोबर एचयूएफचा लाभ घेऊ शकतो.