AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax Slab : माझा टॅक्स स्लॅब कोणता रे भाऊ? एक क्लिकवर मिळवा उत्तर

Income Tax Slab : तुमचा टॅक्स स्लॅब नेमका कोणता, याचे उत्तर शोधुयात

Income Tax Slab : माझा टॅक्स स्लॅब कोणता रे भाऊ? एक क्लिकवर मिळवा उत्तर
कर रचनेचा संभ्रम
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 8:26 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या बजेटमध्ये आयकर बाबत मोठे बदल करण्यात आले. नवीन कर व्यवस्थेत (New Tax Regime) बदल झाला. पण लोकांच्या मनातील करांबाबतचा गोंधळ अद्यापही कायम आहे. दोन कर व्यवस्था आल्यामुळे हा संभ्रम आहे. नवीन कर व्यवस्था आणि जुनी कर व्यवस्था असे दोन पर्याय केंद्र सरकारने दिले आहेत. पर्याय निवडीचे स्वातंत्र्य नागरिकांना देण्यात आले आहे. तुम्हाला कोणत्या आर्थिक वर्षात किती आयकर भरावा लागेल, याची गणना करण्यासाठी अर्थात तुम्ही कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये (Income Tax Slab) मोडता, हे पाहणे आवश्यक आहे. अर्थात कर रचनेची निवड होण्यापूर्वी आता तुम्हाला कर व्यवस्था निवडावी लागणार आहे. केंद्र सरकारने देशात नवीन कर व्यवस्था सुरु केली आहे. तसेच जुनी कर व्यवस्थाही सुरु ठेवली आहे. या दोन्हीपैकी एक व्यवस्था तुम्हाला कर जमा करण्यासाठी निवडावी लागेल. त्यानंतर तुमचे करपात्र उत्पन्न किती आहे, कर लागू होईल ती कमाई किती आहे, याची माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला कर जमा करता येईल.

जर तुम्ही जुन्या कर व्यवस्थेची निवड कराल तर तुम्हाला कर वजावट (Tax Deduction) आणि कर सवलतीच्या ( Tax Exemption) मार्गाने कर वाचविण्याची सुविधा मिळेल. यातंर्गत तुम्हाला House Rent Allowance exemption, Leave Travel Allowance exemption, standard deduction यावर सवलत मिळेल.

जुन्या कर व्यवस्थेत तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C ते 80U पर्यंत कर सवलत मिळविता येईल. तुमचे एकूण उत्पन्न कर वजावट आणि कर सवलतीतून वजा केल्यानंतर जी रक्कम उरेल, ती करपात्र रक्कम असेल. ते तुमचे कर पात्र उत्पन्न असेल. त्यावर तुम्हाला कर द्यावा लागेल.

हे सुद्धा वाचा

तुमचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये आहे, असे गृहित धरुयात. तुम्ही आयकर खात्याच्या कलम 80C, 80TTA, 80CCD(1b) अंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा दावा करु शकता. पुढे 9 लाख रुपयांवर तुम्हाला कर द्यावा लागेल.

जुन्या कर व्यवस्थेत तुमचा टॅक्स स्लॅब 5 लाख रुपये ते 10 लाख रुपयांदरम्यान असेल. त्यावर 20% कर द्यावा लागेल. तर नवीन कर व्यवस्थेत तुम्हाला 15% टॅक्स स्लॅब आहे. त्यानुसार कर द्यावा लागेल.

नवीन आणि जुन्या कर व्यवस्थेनुसार त्यात थोडाफार फरक पडतो. सरसकट सवलत आणि विविध गुंतवणूक, बचत दाखवून मिळविलेली कर सवलत असा या दोन्ही कर व्यवस्थेतील फरक आहे. तुमच्यापुढे पर्याय देण्यात आले आहेत. कर सल्लागाराशी मसलत करुन तुम्ही कर सवलतीचा फायदा मिळवू शकता.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.