कर आणाव ‘शून्या’वर, ही तर माझी पण इच्छा, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला निर्मला सीतारमण यांन व्यक्त केली लाखोंच्या मनातील भावना, पण…

Tax Zero : झिरो टॅक्स हे माझं स्वप्न आहे. माझी तर इच्छा आहे की कराचे ओझे जवळपास शून्य करायचे, असे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले. त्यानंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. मध्यमवर्गाला या बजेटमध्ये करात मोठ्या बदलाची अपेक्षा होती. पण हा वर्ग नाराज झाला.

कर आणाव 'शून्या'वर, ही तर माझी पण इच्छा, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला निर्मला सीतारमण यांन व्यक्त केली लाखोंच्या मनातील भावना, पण...
शून्य कर ही तर माझी इच्छा
Follow us
| Updated on: Aug 14, 2024 | 3:38 PM

देशातील करदात्यांवर कराचा कोणताच बोजा नको, अशी तर लाखो करदात्यांची इच्छा आहे. प्रत्येक वस्तू, सेवावर सरकार कर आकारते. उत्पन्नावर कर घेते. कार खरेदी असो वा घर खरेदी सरकारला महसूल मिळतो. मग उत्पन्नावर कर तरी कशाला हवा, अशी त्यांची धारणा आहे. पण राष्ट्राचा गाडा चालवण्यासाठी कर महत्वाचा आहे. त्यातच आता निर्मला सीतारमण यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. झिरो टॅक्स हे माझं स्वप्न आहे. माझी तर इच्छा आहे की कराचे ओझे जवळपास शून्य करायचे, असे त्या म्हणाल्या. तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आला आहे.

करा आणायचा शून्यावर

भोपाळमध्ये IISER च्या दीक्षांत समारंभात त्यांनी संवाद साधला. बजेटमध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाढवण्यासंदर्भात सरकारची भूमिका विषद केली. या कार्यक्रमात त्यांनी अनेक मुद्यांवर मत व्यक्त केले. कर जवळपास शून्य करण्याची माझी इच्छा आहे. पण भारतासमोर अनेक गंभीर आव्हानं असल्याचे त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

या बजेटवर मध्यमवर्ग नाराज असल्याची चर्चा आहे. बजेटमध्ये कर व्यवस्थेत कुठलाच बदल झाला नाही. महागाई आणि कर्जाच्या हप्त्यांनी मध्यमवर्गाला जेरीस आणले आहे. जुन्या कर व्यवस्थेला तर सरकारने हात सुद्धा लावला नाही. करदात्यांना कुठलाच मोठा दिलासा मिळाला नाही, असा सूर आहे. त्या पार्श्वभूमीवर माझे काम महसूल जमा करणे, गोळा करण्याचे आहे, लोकांना नाहक त्रास देण्याचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कराचा पैसा जातो तरी कुठं?

आमच्याकडून घेतलेल्या कराच तुम्ही करता तरी काय याचे उत्तर सतत द्यावे लागते. अनेकदा अर्थमंत्री म्हणून मला समाधान मिळत नाही, कराचे ओझे कमी करावे, असे वाटते. ते का करता येत नाही, यामुळे मनात रूखरूख कायम असते.

आम्ही मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला आहे. जगात जीवाश्म इंधनापासून ते अक्षय ऊर्जेपर्यंतच्या परिवर्तनासाठी जगाने पैसे देण्याचे वचन दिले होते. परंतु ते पैसे अद्याप मिळालेले नाहीत. पॅरिसमध्ये जे आश्वासन देण्यात आले होते. ते देशाने स्वतःच्या पैशांनी पूर्म केले. कर पद्धतीमुळे अक्षय ऊर्जा आणि इतर कल्पकतापूर्ण प्रकल्पांना पैसा मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.