Income Tax : हे 5 मोठे नियम बदलले, आता उत्पन्नावर पूर्वीपेक्षा जास्त कर भरावा लागणार

भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये, असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्हाला कर वगैरेच्या त्रासांपासून मुक्त व्हावे लागेल, तर या 5 नियमांबद्दल जाणून घ्या. हे नियम पीएफ, टीडीएस, आधार पॅन लिंक, लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन आणि ज्येष्ठ नागरिक आयटीआरशी संबंधित आहेत.

Income Tax : हे 5 मोठे नियम बदलले, आता उत्पन्नावर पूर्वीपेक्षा जास्त कर भरावा लागणार
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 8:20 AM

नवी दिल्लीः तुमच्या आर्थिक व्यवहार आणि बँकेशी संबंधित अनेक गोष्टी बदलल्यात. हे बदल आर्थिक वर्ष 2022 साठी लागू आहेत आणि काही मर्यादा वाढवण्यात आल्यात. परंतु हे बदल चालू आर्थिक वर्षातच लागू करावे लागतील. भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये, असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्हाला कर वगैरेच्या त्रासांपासून मुक्त व्हावे लागेल, तर या 5 नियमांबद्दल जाणून घ्या. हे नियम पीएफ, टीडीएस, आधार पॅन लिंक, लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन आणि ज्येष्ठ नागरिक आयटीआरशी संबंधित आहेत.

1. पीएफवर व्याज

प्रॉव्हिडंट फंड पीएफच्या व्याजावर कराचा नियम यंदा लागू झालाय. ईपीएफवर मिळणाऱ्या व्याजासंदर्भात सरकारने नवीन नियम जारी केलाय. जर EPF मध्ये पैसे जमा झाले आणि त्यावर 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त व्याज मिळाले, तर आता आयकर भरावा लागणार आहे. या नवीन आर्थिक वर्षात हा नियम 1 एप्रिल 2021 नंतर लागू आहे. मात्र यामध्ये करदात्याला मोठी सुविधा देण्यात आलीय. जर तुमच्या पीएफमध्ये कंपनीने पैसे जमा केले नाहीत, तर तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंतच्या ईपीएफच्या व्याजावर कर सूटचा लाभ घेऊ शकता.

2. टीडीएसचा नवीन नियम

यंदा जास्त दराने टीडीएस कापला जात आहे. ते 1 जुलै 2021 पासून लागू आहे. ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केले नाही, त्यांच्यासाठी हा नियम आहे. ज्यांनी आयटीआर भरला नाही आणि ज्यांचा टीडीएस कापला आहे, त्यांचा टीडीएस पूर्वीपेक्षा जास्त कापला जाईल. जर एखाद्या करदात्याचा टीडीएस 50,000 रुपयांपेक्षा जास्त कापला गेला आणि त्याने आयकर विवरणपत्र भरले नाही तर त्याचा टीडीएस जास्त दराने कापला जाणार आहे. हा नियम शेवटच्या दोन आयटीआर फायलिंगसाठी आहे. आयकर विभागानुसार, टीडीएस कापलेल्या कराच्या दुप्पट टक्केवारीने कापला जाईल. जर करदात्याने टीडीएस कापणाऱ्या संस्थेला पॅनची माहिती दिली नसेल तर 20% पर्यंत कपात केली जाऊ शकते.

3. आधार पॅन लिंक

तुमचे पॅन आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य करण्यात आलेय. आधी त्याची शेवटची तारीख 30 जून 2021 ठरवण्यात आली होती, पण नंतर कोरोना महामारीमुळे हा कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला. जर तुम्ही या निर्धारित तारखेपर्यंत पॅन आणि आधार लिंक केले नाही तर पॅन बंद होईल आणि नंतर तुम्हाला दंड भरावा लागेल, हे काम खूप सोपे आहे आणि घरी बसून ऑनलाईन करता येते. जवळजवळ सर्व वित्तीय संस्था किंवा बँकांच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी पॅन-आधार लिंक अनिवार्य करण्यात आलेय.

4. जोडलेली विमा योजना

विमा योजनेत गुंतवणूक करताना या आर्थिक वर्षात काही नियम बदलण्यात आलेत. हे बदल लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनमध्ये केले गेलेत, जे शेअर बाजाराशी जोडलेले आहेत. जर तुम्ही एका वर्षात लिंक केलेल्या विमा योजनेमध्ये 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रीमियम भरला आणि त्या योजनेचा आर्थिक लाभ घेतला, तर कमावलेले पैसे भांडवली नफा म्हणून गणले जातील आणि तुम्हाला कर भरावा लागेल. हे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासारखे आहे. विमा योजना ज्या नॉन लिंक्ड आहेत किंवा शेअर बाजाराशी जोडलेल्या नाहीत, त्यांना कोणताही कर आकर्षित होणार नाही.

5. ज्येष्ठ नागरिक ITR

आता 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयकर विवरणपत्र भरण्यापासून सूट देण्यात आलीय. पण यात एक अट आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही एका बँकेकडून पेन्शन घेतली आणि त्या बँकेकडून व्याज घेतले, तर त्या विशिष्ट चालू वर्षात आयटीआर भरण्याची गरज राहणार नाही. समजा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचे एसबीआयमध्ये खाते आहे आणि ते पेन्शनसह व्याजाचा लाभ घेतात, तर त्यांना आयटीआर दाखल करण्यास बांधील राहणार नाही. हा नियम 2021 आर्थिक वर्षापासून लागू आहे. पूर्वी असे नव्हते.

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2021: आपल्या बहिणीला द्या हे गिफ्ट, किंमत कालांतराने वाढतच राहणार

SBI खास तुमच्यासाठी आणले e-RUPI, ‘या’ रक्षाबंधनात बहिणींना कॅशलेस गिफ्ट द्या

Income Tax: These 5 big rules have changed, now you have to pay more tax on income than before

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.