भारताने कॅनडासाठी पुन्हा सुरु केली व्हीसा सर्व्हीस, सुरुवातीला या चार प्रकारचे व्हीसा मिळणार

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी 18 सप्टेंबर रोजी भारतावर खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरुन आरोप केले होते. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंघ बिघडून व्हीसा सेवा बंद करण्यात आली होती.

भारताने कॅनडासाठी पुन्हा सुरु केली व्हीसा सर्व्हीस, सुरुवातीला या चार प्रकारचे व्हीसा मिळणार
Canada visa Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 25, 2023 | 9:57 PM

कॅनडा | 25 ऑक्टोबर 2023 : भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध दुरावल्यानंतर बंद केलेली व्हीसा सेवा आता पुन्हा सुरु केली आहे. भारत 26 ऑक्टोबरपासून कॅनडातील काही व्हीसा सेवा पुन्हा सुरु करीत आहे. बुधवारी ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की चार प्रकारच्या व्हीसा सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. यात प्रवेश व्हीसा, बिझनेस व्हीसा, मेडीकल व्हीसा आणि कॉन्फरन्स व्हीसा यांचा समावेश आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी 18 सप्टेंबर रोजी भारतावर खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरुन आरोप केले होते. भारताने हे सर्व आरोप फेटाळले होते, मात्र त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडले होते. त्यानंतर भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हीसा जारी करण्यास बंदी घातली होती. आता भारताने ही व्हीसा बंदी उठवली असून आता पुन्हा चार प्रकारच्या व्हीसासाठी अर्ज करता येणार असल्याचे कॅनाडातील ओटावा येथील भारतीय दुतावास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यात प्रवेश व्हीसा, बिझनेस व्हीसा, मेडीकल व्हीसा आणि कॉन्फरन्स व्हीसा यांचा समावेश आहे. ओटावा येथील उच्चायुक्तांनी हा निर्णय सुरक्षा स्थितीचा सखोल अभ्यास केल्यानंतर घेतला आहे. व्हीसासाठी आता येत्या 26 ऑक्टोबर पासून अर्ज करता येणार आहेत.

व्हीसा सेवा सुरु – तणाव निवळणार

व्हीसा सेवा पुन्हा सुरु केल्याने कॅनडामध्ये खलिस्तानवादी शीख नेत्याच्या हत्येमुळे निर्माण झालेला दोन्ही देशातील तणाव कमी होणार आहे. भारताने गेल्या महिन्यात कॅनडाच्या लोकांसाठी नवीन व्हीसा देणे थांबविले होते. त्यानंतर कॅनडाने देखील आपले 41 अधिकाऱ्यांना पुन्हा माघारी बोलावले होते.

भारत आणि कॅनडात तणाव

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी खलिस्तानवादी नेते हरदीप सिंह निज्जर यांची हत्येत भारत सरकारच्या एजंटवर संशय असल्याचा आरोप केला होता.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.