AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्थिक आघाडीवर आनंदवार्ता, GDP ची घौडदौड सुरुच, चीनच्या तोंडचे पळाले पाणी

Indian Economy | भारताच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा गरुड झेप घेतली आहे. सप्टेंबर महिन्यातील तिमाहीने आनंद संचारला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जो अंदाज वर्तावला होता, त्यापेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेने मोठा पल्ला गाठला. भारत हा सर्वाधिक वेगाने धावणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. अर्थव्यवस्थेच्या या भरारीने चीनला मोठी धोबीपछाड दिली आहे.

आर्थिक आघाडीवर आनंदवार्ता, GDP ची घौडदौड सुरुच, चीनच्या तोंडचे पळाले पाणी
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 10:41 AM

नवी दिल्ली | 1 डिसेंबर 2023 : भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली आहे. जगभरातील अर्थव्यवस्था मंदीच्या प्रभावाने मंदावल्या असताना भारतीय अर्थव्यवस्थने नेत्रदीपक कामगिरी बजावली. जुलै-सप्टेंबर 2023-24 या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 7.6 टक्क्यांची झेप घेतली. या आर्थिक वर्षातील ही सर्वात दमदार कामगिरी ठरली आहे. सकल देशातंर्गत उत्पादनाची (GDP) आकडेवारी गुरुवारी सांख्यिकी विभागाने समोर आणली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. खुद्द भारतीय रिझर्व्ह बँकेचे अंदाज पण भारतीय अर्थव्यवस्थेने मोडीत काढत आगेकूच केली आहे. केंद्र सरकारचा खर्च, अर्थ क्षेत्रातील दमदार कामगिरी, खाण आणि बांधकाम विभागामुळे हा डोंगर सहज चढता आला. या आकडेवारीने चीनला धोबीपछाड दिली आहे.

अशी झाली वाढ

सकल देशातंर्गत उत्पादन या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 41.74 लाख कोटी रुपये होते. तर गेल्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत (Q2 2022-23) जीडीपी 38.78 लाख कोटी रुपये होते. त्यावेळी जीडीपीची वाढ 6.2 टक्के होता. या तिमाहीत जीडीपीचा वेग 7.6 टक्के आहे. 30 नोव्हेंबर रोजी भारतीय सांख्यिकी विभागाने ही आकडेवारी जाहीर केली. त्यातील आकडेवारीने अनेक अर्थतज्ज्ञांना धक्का दिला. जागतिक घडामोडींचा विचार करता हा वेग अचंबित करणारा आहे.

हे सुद्धा वाचा

ही घौडदौड वाखण्याजोगी

भारतीय अर्थव्यवस्थेने झेंडे रोवले आहे. या वेगवान वाढीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही घौडदौड वाखण्याजोगी असल्याचे मत त्यांनी मांडले. अशा बिकट परिस्थितीतील या आर्थिक वर्षातील ही दमदार कामगिरी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सोशल मीडिया X वर याविषयीची पोस्ट लिहिली आहे. या कामगिरीतून भारतीय अर्थव्यवस्थेची क्षमता आणि ताकद दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

आरबीआयचा अंदाज चुकवला

भारतीय अर्थव्यवस्थेची घौडदौड डोळे दिपवणारी आहे. यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या तिमाहीतील प्रगतीविषयीचा अंदाज जोखला होता. त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत 6.5 टक्क्यांचा टप्पा गाठण्याचा दावा केला होता. पण हा दावा पण खोटा ठरला. भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी मूसंडी मारली. भारतीय रिझर्व्ह बँकेने या आर्थिक वर्षातील पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीसाठी 6.5 टक्के तर तिसऱ्या तिमाहीसाठी 6.0 टक्के आणि अंतिम, चौथ्या तिमाहीसाठी 5.7 टक्के विकासाचा अंदाज वर्तवला आहे.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.