नवी दिल्ली : आजचे युग हे स्टार्ट अपचे (Start Up) असून, भारत आज या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. भारतामध्ये आतापर्यंत 70 पेक्षा अधिक स्टार्ट अपने एक अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. ही आपल्यासाठी गौरवाची गोष्ट असून, अशा स्टार्ट अपमुळेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. त्यामुळे स्टार्ट अपला जास्तीत जास्त अनुकूल वातावरण निर्माण होईल यासाठी केंद्राकडून प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. ते आज मन की बातमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना मोदी यांनी म्हटले की, जगात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक काही तरी नवीन करण्याची भावना, दुसरी जोखमी घेण्याची तयारी तीसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीद्द व्यक्ती जवळ या गोष्टी असतील तर यश नक्कीच मिळते हे भारतात स्टार्ट अप सुरू करणाऱ्या अनेक उद्योजकांनी दाखवून दिले आहे. मोदी म्हणाले की, आपण सध्या स्टार्ट अपची चर्चा मोठ्या प्रमाणात करतो, स्टार्ट अपमध्ये सध्या भारत जगाचे नेतृत्व करत आहे. देशातील 70 पेक्षा अधिक स्टार्ट अपनी एक अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. अशा स्टार्ट अपला आपण यूनिकॉर्न असे म्हणतो. सध्या भारतातील अनेक स्टार्ट अपनी युनिकॉर्नच्या दिशेने आगेकूच केली आहे.
कोरोना काळात अर्थव्यवस्थेला फटका
गेल्या दोन वर्षांपासून जगासह देशावर कोरोनाचे सावट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये स्टार्टअप उदयास आले. नुसतेच स्थिरावले नाही, तर त्यांनी मोठी व्यवसायिक भरारी देखील घेतली आहे. भारतातील सुमारे 70 पेक्षा अधिक स्टार्टअपने तब्बल एक अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. मन की बात मध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले की, डिसेंबर महिन्यात सशस्त्र सेना झेंडा दिवस साजरा करण्यात येतो. 16 डिसेंबर 1971 ला युद्धात मिळालेल्या विजयाचे हे प्रतिक आहे. हे या विजयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मी या युद्धात शहीद झालेल्या सर्व सैनिकांना आणि त्यांच्या वीर मातांना अभिवादन करतो.
पीएफ खाते बंद झाले? चिंता नको, आता पाचशे रुपये भरून पुन्हा सुरू करता येणार खाते
कच्च्या तेलाचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर
Omicron Effect: सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?