चीनला मागे टाकत, भारत बनला iPhone हब ! जगातील तब्बल इतके टक्के आयफोन भारतात असेंबल
एप्पल कंपनी आता जगभरात विकणाऱ्या दर ५ आयफोन पैकी १ आयफोनची भारतात निर्मिती करीत आहे. सरकार देखील 'मेक इन इंडिया' अंतर्गत भारतात या फोनची मॅन्युफॅक्चरिंग वाढवत आहे.

अमेरिकेची दिग्गज कंपनी Apple ने भारतात आयफोन असेंबल करण्यात मोठी गरुड भरारी घेतली आहे. चीनला त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेने चीनमधून अप्पल असेंबलिंग करण्याचा उद्योग भारतात हलविल्यानंतर हा प्रकार घडला आहे. गेल्यावर्षी अप्पलने सुमारे २२ अब्ज डॉलरचे ( १.२ कोटी रुपये ) आयफोन्स तयार केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. अप्पल आता चीनच्या बाहेर अप्पलचे उत्पादन करीत आहे आणि भारत आता एप्पल फोन उत्पादनात ग्लोबल हब झाला आहे.
एप्पल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारताने नवीन फरारी घेतली आहे. गेल्यावर्षी एप्पल आयफोन कंपनीने येथे सुमारे २२ अब्ज डॉलरचे उत्पादन केले आहे. म्हणजेत १.८ कोटी रुपयांचे आयफोन तयार केले आहे. हे उत्पादन गेल्यावर्षी ६० टक्क्यांहून अधिक आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत आता आयफोनचे असेबलिंग भारतात होत आहे. फेब्रुवारीत ‘रेसिप्रोकल’ टॅरिफ योजनेंतर्गत घोषणा केल्यानंतर भारतातून अमेरिकेसाठी आयफोन शिपमेंटमध्ये वेग आला आहे. एप्पलचे सरासरी उत्पादन आणि निर्यात संपूर्ण आर्थिक वर्षात मार्चपर्यंत वाढले आहे.
२० टक्के उत्पादन आता भारतात
एप्पल कंपनी आता जगभरात विकणाऱ्या दर ५ आयफोन पैकी १ आयफोनची भारतात निर्मिती करीत आहे. म्हणजे आयफोनचे २० टक्के उत्पादन आता भारतात होत आहे. सरकार देखील ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतात या फोनची मॅन्युफॅक्चरिंग वाढवत आहे.




चीन नव्हे भारत बनला हब
Apple आणि त्याचे पुरवठादार फॉक्सकॉन, विस्ट्रॉन (आता टाटाकडे ) आणि पेगाट्रॉन हे सर्वच जण आता चीनऐवजी भारतात आयफोनची मॅन्युफॅक्चरिंग करण्यात रस घेत आहेत. त्यामुळे आयफोनचे प्रोडक्शन वेगाने होत आहे. कोविड-१९ मध्ये लॉकडाऊनमुळे Apple च्या सर्वात मोठ्या फॅक्टरीला फटका बसला होता.
भारतात कोठे iPhone तयार होतो ?
भारतात iPhone सर्वाधिक असेंबलिंग दक्षिण भारतातील फॉक्सकॉनच्या फॅक्टरीत होत असते. त्याशिवाय विस्ट्रॉनचा भारतातील बिझनेस ताब्यात घेणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आयफोनची असेब्लिंग होत आहे. त्यामुळे भारतातील आयफोनच्या निर्मितीचे प्रमाण वाढत चालले आहे.
निर्यातीचा आधार
आता भारतातील आयफोन मॅन्युफॅक्चरिंग केवळ घरगुती मार्केटपर्यंत मर्यादित राहीलेले नाही. आता हे डिव्हाईसेस जगभरात खासकरुन अमेरिकेत वेगाने पोहचत आहेत. ८ एप्रिल रोजी देशाचे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की मार्च २०२५ पर्यंत एप्पलने भारतात सुमारे १.५ ट्रिलियन रुपयांचे iPhones निर्यात केले आहेत.
भारतात Apple ची रुजवात
आता Appleचा फोकस भारतात हळूहळू शिफ्ट होण्याकडे आहे. Apple ला त्यांचे 10 टक्के प्रोडक्शन क्षमता चीन बाहेर आणण्यास 8 वर्षे लागू शकतात. परंतू सुरुवात भारतातून झाली आहे. भारताच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची निर्यात अलिकडच्या वर्षांत सरकारच्या प्रोत्साहन ( पीएलआय ) योजनेमुळे वेगाने वाढत आहे. सरकारची ही योजना निर्यातीला प्रोत्साहन देत आहे आणि आयात कमी करीत आहे. कारण आता घरगुती उत्पादन आता घरगुती मागणीच्या ९९ टक्के पूर्तता करीत आहे.