लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 16 टक्क्यांची उसळी; ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास मालामाल होण्याची संधी
Share Market | India Pesticides Limited ही कंपनी कृषी क्षेत्रातील किटकनाशकांची निर्मिती करते. सध्याच्या घडीला ही कंपनी अत्यंत वेगाने वाढत आहे. India Pesticides Limited च्या उत्पादनात 37.71 टक्क्यांची वाढ झाली आहे.
India Pesticides Listing: इंडिया पेस्टिसाईडस लिमिटेड ही कंपनी सोमवारी भांडवली बाजारात (Share Market) सूचिबद्ध झाली. या कंपनीच्या समभागांची इश्यू प्राईस 296 रुपये इतकी होती. मात्र, लिस्टिंग झाल्यानंतर India Pesticides च्या समभागाने तब्बल 16 टक्क्यांची उसळी घेतली. त्यामुळे आता India Pesticides च्या समभागाची किंमत थेट 360 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. (India Pesticides Limited IPO gained 16 percent on listing day)
मुंबई शेअर बाजारात India Pesticides च्या समभागाने 368 रुपयांची पातळीही गाठली होती. मात्र, दिवस संपेपर्यंत या समभागाची किंमत 343.15 रुपयांपर्यंत खाली घसरली. आकडेवारीनुसार तुलना करायची झाल्यास इश्यू प्राईसच्या तुलनेत India Pesticides चा समभाग 16 टक्क्यांच्या प्रीमियमवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातही (NSE) India Pesticides च्या समभागाची किंमत लिस्टिंगच्यावेळी 350 रुपयांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर बाजार बंद होईपर्यंत हा भाव 342.30 रुपयांच्या पातळीवर आला होता. त्यामुळे मंगळवारीही या समभागाच्या किंमतीत वाढ होऊ शकते.
800 कोटींचा आयपीओ
India Pesticides भांडवली बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वी BSE मध्ये 21.22 लाख शेअर्सची विक्री झाली होती. तर NSE मध्ये 2.56 कोटी शेअर्सची विक्री झाली होती. BSE मध्ये कंपनीने 3,951.84 कोटी रुपयांचे भांडवल जमवले. India Pesticides चा गेल्या महिन्यातील IPO यशस्वी ठरला होता. त्यामुळे यावेळी IPO मधील समभागांची इश्यू प्राईस 290 ते 296 इतकी ठेवण्यात आली होती. India Pesticides Limited ही कंपनी कृषी क्षेत्रातील किटकनाशकांची निर्मिती करते. सध्याच्या घडीला ही कंपनी अत्यंत वेगाने वाढत आहे. India Pesticides Limited च्या उत्पादनात 37.71 टक्क्यांची वाढ झाली आहे.
इतर बातम्या
गृह कर्ज घेणाऱ्यांनी प्रीपेमेंट करणे किती फायदेशीर?; जाणून घ्या याबाबत सर्व माहिती
(India Pesticides Limited IPO gained 16 percent on listing day)