तज्ज्ञांचा अंदाज: भारतीय अर्थव्यवस्थेची नव्या वर्षात घौडदोड; महागाईचा चिंताजनक स्तर!

कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने नवी आव्हाने निर्माण केली आहेत. "आगामी काळात विषाणूचे अनेक व्हेरियंट समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, लसीकरणाच्या वाढत्या टक्केवारीमुळे आर्थिक विकासाच्या जोखमीत घट होईल" असे वर्मा यांनी म्हटले आहे.

तज्ज्ञांचा अंदाज: भारतीय अर्थव्यवस्थेची नव्या वर्षात घौडदोड; महागाईचा चिंताजनक स्तर!
INDIAN ECONOMY
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 8:22 PM

नवी दिल्ली : आगामी तिमाहीत भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) कामगिरी समाधानकारक राहणार असल्याचे संकेत आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीचे (एमपीसी) सदस्य जयंत वर्मा यांनी दिले आहेत. अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ होईल आणि वित्तीय वर्षात वृद्धी दर वाढेल असे वर्मा यांनी म्हटले आहे. वाढता महागाई बद्दल चिंता व्यक्त करतानाच महागाई दरातील सातत्य अधिक चिंताजनक असल्याचे वर्मा म्हणाले.

अर्थतज्ज्ञ वर्मा म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्था आणि तिच्या वृद्धीच्या परिणामांबाबत आशावादी आहे. आगामी वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये सर्वोत्तम वृद्धी दर राहील. आर्थिक व्यवहार कोविड प्रकोपाच्या परिणामांच्या प्राथमिक टप्प्यातून सावरले आहेत आणि आगामी वित्तीय वर्षात यामध्ये सुधारणा दिसून येईल. आगामी काही तिमाहित गुंतवणुकीत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.”

विषाणूचे नवे व्हेरियंट:

कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने नवी आव्हाने निर्माण केली आहेत. “आगामी काळात विषाणूचे अनेक व्हेरियंट समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, लसीकरणाच्या वाढत्या टक्केवारीमुळे आर्थिक विकासाच्या जोखमीत घट होईल” असे वर्मा यांनी म्हटले आहे.

महागाई दर 5 टक्क्यांवर!

महागाईच्या दरात अपेक्षित घसरण अद्यापही साध्य झाली नाही. महागाईच्या दरात घसरण होऊन चार टक्क्यांचे लक्ष्य साधता आलेले नाही. त्यामुळे बाजार घटकांचा विचार करता महागाईचा दर पाच टक्क्यांवर कायम राहण्याची शक्यता आहे.

वृद्धीच्या ‘इंजिना’ला गती!

भारतीय अर्थव्यवस्थेत मार्चमध्ये समाप्त होणाऱ्या वर्तमान वित्तीय वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत गतीने वाढ नोंदविली गेली. ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालातून ही बाब समोर आली. यानुसार भारताच्या जीडीपीत 9.4 टक्के वृद्धी नोंदविली जाण्याची शक्यता आहे.

सेवा क्षेत्राला सर्वाधिक फायदा:

ब्यूमबर्गच्या अहवालानुसार, तिसऱ्या तिमाहीचे निष्कर्ष दर्शवितात की, दुसऱ्या तिमाहीत दुसऱ्या लाटेचे परिणाम नष्ट करण्याची शक्यता आहे. खासगी गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक लाभ सेवा क्षेत्राला होण्याची शक्यता आहे. सरकारद्वारे लागू निर्बंधातील शिथिलतेमुळे गुंतवणुकीचा ओघ आगामी काळात आणखी वाढेल.

इतर बातम्या :

‘या’ कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखाचे झाले 11 लाख, टाटा केमिकललाही टाकले मागे

आयात शुल्क कपातीचा परिणाम, खाद्य तेल झाले स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

PF Withdrawal: पीएफ कधी काढता येतो?; जाणून घ्या पीएफबाबतच्या महत्त्वाच्या अटी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.