इंडियन ऑइल आणि कोटकचे फ्युएल क्रेडिट कार्ड लॉन्च, रिवॉर्ड पॉईंटवर मिळणार मोफत इंधन
ग्राहकांना या क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्सवर इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपांवरून मोफत इंधन खरेदी करता येईल.
मुंबई : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (‘केएमबीएल’/ ‘कोटक’) आणि इंडियन ऑइल यांनी आज को-ब्रॅण्डेड फ्युएल क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. इंडियन ऑइल कोटक क्रेडिट कार्ड रुपे नेटवर्कवर उपलब्ध आहे. इंडियन ऑइल ही सर्वांत मोठी तेल मार्केटिंग कंपनी असून, तिचे देशभरात ३४,०००हून अधिक पेट्रोलपंप आहेत. देशातील इंडियन ऑइलच्या कोणत्याही इंधन पंपावर वाहनात इंधन भरून, इंडियन ऑइल कोटक क्रेडिट कार्ड ग्राहक, रिवॉर्ड पॉइंट्स कमावू शकतात. हे रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करून इंडियन ऑइल इंधन पंपांवरून मोफत इंधन खरेदी करता येईल.
कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या कंझ्युमर असेट्स विभागाचे अध्यक्ष अंबुज चांदना, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या क्रेडिट कार्ड विभागाचे व्यवसाय प्रमुख फ्रेडरिक डिसुझा; इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक (रिटेल विक्री- उत्तर व पूर्व) विज्ञान कुमार आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यपालन अधिकारी प्रवीणा शहा, यांच्या हस्ते हे कार्ड लाँच करण्यात आले.
इंडियन ऑइल कोटक क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये:
· इंडियन ऑइल इंधन पंपांवर प्रत्येक वेळी वाहनात इंधन भरल्यानंतर ४ टक्के (दर महिन्याला ३०० रुपयांपर्यंत) रक्कम रिवॉर्ड पॉइंट्सच्या स्वरूपात परत मिळवा · बाहेर जेवण, किराणामाल खरेदी व अन्य पेमेंट्सवर रिवॉर्ड पॉइंट्सच्या स्वरूपात २ टक्के (दर महिन्याला २०० रुपयांपर्यंत) रक्कम परत मिळवा · दर महिन्याला १०० रुपयांपर्यंत, १ टक्का इंधन अधिभार सवलत मिळवा · ४८ दिवसांपर्यंत व्याजमुक्त पत कालावधी · स्मार्ट ईएमआय · कार्ड हरवल्यास शून्य दायीत्व (झिरो लॉस्ट कार्ड लायबिलिटी) · संपर्कविरहित कार्ड- टॅप अँड पे
ग्राहकांना त्यांच्या सर्व खरेद्या या कार्डाद्वारे करण्यास प्रोत्साहन मिळावे अशा रितीने हे उत्पादन डिझाइन करण्यात आले आहे. इंडियन ऑइलचे भक्कम ब्रॅण्ड व वितरण नेटवर्क हे या भागीदारीचे मोठे बलस्थान आहे. नवोन्मेष्कारी पेमेंट सोल्युशन्स ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आणि डिजिटल पेमेंट्सच्या अधिक विस्तृत स्वीकृतीला चालना देण्यात रुपे प्लॅटफॉर्म आम्हाला मदत करणार आहे,” असे कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या क्रेडिट कार्डस् विभागाचे व्यवसाय प्रमुख फ्रेडरिक डिसुझा यांनी सांगितले.
इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक (रिटेल विक्री- उत्तर व पूर्व) विज्ञान कुमार म्हणाले, “आपल्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टीतील डिजिटल इंडियासाठी इंडियन ऑइल वचनबद्ध आहे आणि या भागीदारीच्या माध्यमातून इंडियन ऑइलने आमच्या सर्व इंधन पंपांवर डिजिटल व्यवहार होतील याची खात्री करणारे आणखी एक ठोस पाऊल उचलले आहे. आमच्या ग्राहकांचे मूल्यविधान आणि अनुभव अधिक चांगले करणे हा इंडियन ऑइलसाठी कायमच प्राधान्याचा मुद्दा राहिला आहे आणि कोटक महिंद्राशी झालेल्या या भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अखंडित व सुधारित उत्पादनांच्या समूहात उत्तम अशी भर पडेल असा आत्मविश्वास मला वाटतो. इंडियन ऑइल कोटक क्रेडिट कार्ड केवळ रुपे प्लॅटफॉर्ममार्फत बाजारात आणले जाणार आहे हे सांगतानाही मला आनंद होत आहे. कारण, त्यामुळे भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या उद्दिष्टाच्या पूर्ततेतही योगदान दिले जाणार आहे.”
“ग्राहककेंद्री अनुभव देण्यासाठी एनपीसीआय कायमच वचनबद्ध राहिली आहे. आमच्या दृष्टीने, अधिक चांगला व व्यापक ग्राहक अनुभव देण्यासाठी नवोन्मेष व तंत्रज्ञान ही महत्त्वपूर्ण साधने आहेत आणि आमच्या ग्राहकांसाठी सुलभ व सर्वोत्तम दर्जाची उत्पादने देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. इंडियन ऑइल कोटक रुपे क्रेडिट कार्ड हे कार्डधारकांना इंधन, किराणामाल व बाहेर जेवणासारख्या खर्चांवर अनेक लाभ मिळवून देणार आहे. रुपेच्या संपर्कविरहित तंत्रज्ञानामुळे एक अखंडित पेमेंट अनुभव निर्माण करणार आहे,” असे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या रिलेशनशिप मॅनेजमेंट – मार्केटिंग विभागांचे प्रमुख रजीत पिल्लई म्हणाले.