Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वस्तात घर खरेदी करायचंय, ‘या’ राष्ट्रीयीकृत बँकेनं दिली खास संधी

इंडियन ओव्हरसीज बँकेने त्यांच्या ट्विटरवरुन घरांच्या लिलावाबद्दल माहिती दिली आहे. हे सर्व लिलाव ई-ऑक्शन पद्धतीनं होणार आहेत. Indian Overseas Bank Mega E-Auctions

स्वस्तात घर खरेदी करायचंय, 'या' राष्ट्रीयीकृत बँकेनं दिली खास संधी
Home
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 7:34 PM

नवी दिल्ली: स्वस्त किमतीला घर खरेदी करता यावं अशी अनेकांची इच्छा असते. काही लोक स्वस्तात घर मिळवण्यासाठी बँकाच्याकडून केल्या जाणाऱ्या लिलावांवर नजर ठेऊन असतात. अनेकदा अशा लिलावामधून चांगलं आणि स्वस्तामध्ये घर खरेदी करता येते. सध्या इंडियन ओव्हरसीज बँक अशीच एक योजना घेऊन आली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेतर्फे 11 जूनला लिलावाचं आयोजन करण्यात आलं आहे. (Indian Overseas Bank is conducting Mega E-Auctions for Flats home ware house and others check all details)

इंडियन ओव्हरसीज बँकेने त्यांच्या ट्विटरवरुन घरांच्या लिलावाबद्दल माहिती दिली आहे. हे सर्व लिलाव ई-ऑक्शन पद्धतीनं होणार आहेत. देशातील विविध भागातील घरं, प्लॉट, फ्लॅट, औद्योगिक वास्तू, गोदाम, व्यावसायिक संपत्ती याचा लिलाव 11 जूनला केला जाणार आहे. बँकेकडून केल्या जाणाऱ्या या ई-ऑक्शनमध्ये अनेक लोक सहभागी होणार आहेत. तुम्ही देखील स्वस्तात घर खरेदी करण्यास इच्छूक असाल तर लिलावात सहभागी होऊ शकता.

लिलावात कसं सहभागी होणार ?

आयओबीच्या माहितीनुसार आता 11 जूनला लिलाव होणार आहे. यापूर्वी 28 एप्रिल आणि 20 मे रोजी देखील लिलावाचं आयोजन करण्यात आलं होतं. लिलावातील वास्तू आणि संपत्ती खरेदी करण्यासाठी बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिका माहिती मिळवू शकता.

कोणत्या संपत्तीचा लिलाव होणार?

इंडियन ओव्हरसीज बँकेच्या www.iob.in वेबसाईटवर ‘Properties Available for sale’या लिंकवर लिलाव करण्यात येणाऱ्या संपत्तीची माहिती आहे. या लिंकवरील पीडीएफ डाऊनलोड करुन तुम्ही कोणती संपत्ती किंवा घर खरेदी करायचं हे ठरवू शकता.

लिलावात सहभागी होण्यापूर्वी बँकेच्या वेबसाईटवर जाऊन लिलाव होणाऱ्या संपत्तीची तुम्ही माहिती घेणं आवश्यक आहे. बँकेने मालमत्तांविषयी सर्व कागदपत्रांची पीडीएफ उपलब्ध करुन दिली आहेत. ती डाऊलनोड करुन तुम्ही पाहू शकता. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी सर्व माहिती घ्या. त्यानंतर बँकेच्या बेवसाईटवर तुमची डाक्यूमेंट लिलावात सहभागी होण्यासाठी सादर करा. त्यानंतर तुम्हाला लिलावाची तारीख कळवली जाईल.

संबंधित बातम्या:

EPF खात्याला आधार कार्डसोबत लिंक करा, अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावं लागणार

इन्कम टॅक्स विभागाचं नव पोर्टल पहिल्या दिवशी डाऊन, निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिसला विचारला जाब

(Indian Overseas Bank is conducting Mega E-Auctions for Flats home ware house and others check all details)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.