POST BANK INTREST RATE: व्याजदराला कात्री, 5कोटी खातेधारकांसमोर प्रश्नचिन्ह; नवे व्याजदर काय?

बँकने बचत खात्यांवर (Savings Account) व्याज दरांत (Interest Rate) कपात केली आहे. व्याजदरातील कपात 0.25 टक्क्यांची आहे आणि 1 फेब्रुवारी 2022 पासून सुधारित नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

POST BANK INTREST RATE: व्याजदराला कात्री, 5कोटी खातेधारकांसमोर प्रश्नचिन्ह; नवे व्याजदर काय?
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 7:22 PM

नवी दिल्ली : सुरक्षित आणि किफायतशीर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सर्वसामान्यांची भारतीय पोस्टाच्या योजनांना पसंती असते. त्यामुळे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (India Post Payments Bank) भारतीयांनी सर्वाधिक संख्येनं खाती उघडली. पोस्ट बँकेने पाच कोटी खातेधारकांचा टप्पा विक्रमी वेळेत गाठला होता. दरम्यान, पोस्ट बँकेच्या खातेधारकांसमोर चिंतेचं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. बँकने बचत खात्यांवर (Savings Account) व्याज दरांत (Interest Rate) कपात केली आहे. व्याजदरातील कपात 0.25 टक्क्यांची आहे आणि 1 फेब्रुवारी 2022 पासून सुधारित नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या वेबसाईटवर सुधारित व्याजदराची माहिती देण्यात आली आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक भारत सरकारद्वारे चालविण्यात येणारी बँकिंग सेवा आहे. टपाल खात्यातर्फे ही सेवा चालवली जाते. 1 सप्टेंबर 2018 पासून सेवेला सुरुवात करण्यात आली.

नवे व्याजदर असे असतील?

1 फेब्रुवारी 2022 पासून 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर वार्षिक 2.25 टक्के व्याजदर असेल. यापूर्वी समान रकमेच्या ठेवींना 2.50 टक्के व्याजदर होते. 1 लाखांहून अधिक आणि 2 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर व्याजदर 2.50 टक्के असेल. यापूर्वी समान रकमेसाठी वार्षिक 2.75 टक्के व्याजदर होता.

पोस्टाचं ‘बँकिंग’ पाऊल

इंडियन पोस्ट पेमेंट बँक भारत सरकारद्वारे चालविण्यात येणारी बँकिंग सेवा आहे. टपाल खात्यातर्फे ही सेवा चालवली जाते. 1 सप्टेंबर 2018 पासून सेवेला सुरुवात करण्यात आली. पैसे हस्तांतरण, थेट लाभ हस्तांतरण, देयक भरणा, मायक्रो एटीएम आरटीजीएस आदी सुविधा या बँकेतर्फे पुरविण्यात येतात. पोस्ट पेमेंट बँकेचं स्वतंज्ञ ॲपही आहे. भारत देशातील सुमारे 650 शाखा व 3250 ॲक्सेस पॉइंट्स याचे माध्यमातून या बँकेचे कामकाज पहिल्या टप्प्यात सुरू आहेत. या बँकेत खाते उघडण्यास ‘ई-केवायसी’ या प्रक्रियेचा आधार घेतला जाऊ शकतो.

तिसऱ्या क्रमांकाची पेमेंट बँक

आयपीपीबी, पेटीएम पेमेंट्स बँक तसेच एअरटेल पेमेंट्स बँक (Airtel Payments Bank) नंतर तिसऱ्या क्रमांकाची पेमेंट बँक (Payments Bank) ठरली आहे. आयपीपीबीच्या अलीकडील नोटिफिकेशनुसार, भारतात 1.36 लाख पोस्ट ऑफिस (Post Office) नेटवर्कच्या सहाय्याने पाच कोटी खाती उघडण्यात आली आहेत. त्यापैकी अंदाजित 1.2 लाख पोस्ट ऑफिस ग्रामीण भागातील आहेत. तब्बल 1.47 लाख बँकिंग सेवा प्रदातांच्या मदतीने ग्राहकांना थेट घरपोच सेवा प्रदान केल्या जात आहेत.

संबंधित बातम्या :

GOLD PRICE TODAY : महाराष्ट्रातील सोने बाजार पडझडीनंतर सावरला, मुंबईसह पुण्यात भाववाढ

LIC चा जगभरात डंका, परताव्याच्या बाबतीत आघाडीवर, देशातंर्गत बाजारातील मोठी हिस्सेदार

PVC Aadhaar Card: संपूर्ण कुटुंबाचा मजबूत जोड, एका मोबाईल क्रमांकावर संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....