Indian Railway : थंडीतही प्रवास होणार सुकर! रेल्वेनं सुरू केली ‘ही’ नवी सुविधा
भारतीय रेल्वे(Indian Railway)नं प्रवाशांना दिलासा देणारी सुविधा आणलीय. प्रवासादरम्यान तुम्हाला आता जाडजूड, वजनदार ब्लँकेट आणि चादर सोबत नेण्याची गरज नाही. रेल्वे आता डिस्पोजेबल बेडरोल(Disposable Bed Roll Kit)ची सुविधा सुरू करणार आहे.
नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. हिवाळ्यात प्रवास सोपा होणार आहे. भारतीय रेल्वे(Indian Railway)नं प्रवाशांना दिलासा देणारी सुविधा आणलीय. प्रवासादरम्यान तुम्हाला आता जाडजूड, वजनदार ब्लँकेट आणि चादर सोबत नेण्याची गरज नाही. रेल्वे आता डिस्पोजेबल बेडरोल(Disposable Bed Roll Kit)ची सुविधा सुरू करणार आहे. आधी रेल्वेमार्फत चादर, बेडशीटची व्यवस्था केली जायची. मात्र कोरोना महामारीनंतर रेल्वेनं गेल्या दोन वर्षांपासून बेडरोलची सेवा बंद केली होती.
डिस्पोजेबल बेड रोल या विशेष सेवेअंतर्गत प्रवाशांना 150 रुपयांमध्ये डिस्पोजेबल बेडरोल मिळेल. आता प्रवाशांना प्रवासात ब्लँकेट चादर बाळगण्याची चिंता करावी लागणार नाही. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना ही सुविधा दिली जाणार आहे. रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही सुविधा फक्त निवडक गाड्यांमध्येच उपलब्ध असेल. जसे, की मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस, मुंबई-दिल्ली ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस, गोल्डन टेंपल मेल आणि पश्चिम एक्स्प्रेस.
किती रुपये द्यावे लागतील? रेल्वेच्या या विशेष सुविधेसाठी प्रवाशांना 150 रुपये मोजावे लागणार आहेत. 150 रुपयांच्या किटमध्ये अनेक गोष्टी मिळतील. यामध्ये ब्लँकेटसोबत टूथ पेस्ट आणि मास्क यांसारख्या वस्तूही मिळतील. आणखी काय असेल या कीटमध्ये? जाणून घेऊ..
– किंमत 150.00 1 – बेडशीट (पांढरा रंग 20 GSM) 48×75, (1220 मिमीx1905मिमी) 2 – ब्लँकेट ग्रे/ब्लू (40 GSM) 54×78, (1270 मिमीx1980 मिमी) 3 – इन्फ्लेटेबल एअर पिलो – पांढरा रंग 12×18 4 – उशीचे कव्हर – पांढरा रंग 5 – फेस टॉवेल/नॅपकिन (पांढरा) 6 – फेस मास्क
प्रवाशांची गैरसोय टळली रेल्वेच्या या सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. आता प्रवाशांना ब्लँकेट, चादरींचं ओझं वागवत बसण्याची गरज नाही. कोरोना संसर्गानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून प्रवाशांना प्रवासादरम्यान बेडरोलची सुविधा मिळत नव्हती. ती आता नव्या स्वरुपात पुन्हा सुरू होणार आहे.