Share Market : शेअर बाजारात घसरण, निफ्टी गडगडला, एलआयसी शेअर निच्चांकी स्तरावर…

Bombay stock exchange : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध (लिस्टेड) झाल्यानंतर एलआयसी शेअर घसरणीनंतर नीच्चांकी पातळीवर पोहोचला. सवलतीसह सूचीबद्ध झाल्यानंतर एनएसई वर एलआयसी शेअर 52 आठवड्यांच्या सर्वात नीच्चांकी स्तरावर 775 रुपये प्रति शेअर वर पोहोचला.

Share Market :  शेअर बाजारात घसरण, निफ्टी गडगडला, एलआयसी शेअर निच्चांकी स्तरावर...
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 7:07 PM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स 94 अंकांच्या घसरणीसह 55675 अंकावर बंद झाला. तर निफ्टीत 15 अंकांच्या घसरणीसह 16569 च्या स्तरावर पोहोचला. आज टॉप-30 मधील 9 शेअर तेजीसह आणि उर्वरित 21 शेअर घसरणीसह बंद झाले. टाटा स्टील, इंडसइंड बँक आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये तेजी नोंदविली गेली. एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्शियल्स सर्व्हिेसेसच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आजच्या घसरणीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक प्रमाण मीडिया, बांधकाम क्षेत्र यांचं राहिलं. एलआयसी शेअर्समध्ये (LIC Shares) घसरणीचं चित्र कायम राहिलं. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (Bombay stock exchange) व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध (लिस्टेड) झाल्यानंतर एलआयसी शेअर घसरणीनंतर नीच्चांकी पातळीवर पोहोचला. सवलतीसह सूचीबद्ध झाल्यानंतर एनएसई वर एलआयसी शेअर 52 आठवड्यांच्या सर्वात नीच्चांकी स्तरावर 775 रुपये प्रति शेअर वर पोहोचला.

नजरा आरबीआयच्या बैठकीकडं

रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समीक्षा समितीच्या बैठकीला आजपासून सुरुवात झाली आहे. वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक आर्थिक धोरणात फेररचना करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात फेररचना करण्याचं संकेत यापूर्वीच दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने गेल्या आर्थिक धोरण बैठकीवेळी रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या रेपो दर 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. अर्थतज्ज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार रेपो दरात 0.35 टक्क्यांहून अधिक वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती वधारल्या

कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा प्रभाव शेअर बाजारावर दिसून आला. आज (सोमवारी) ऑईल इंडियाच्या शेअर्समध्ये 11 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली आणि 279 रुपयांच्या स्तरावर बंद झाला. आघाडीच्या ब्रोकरेजने शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. एमके ग्लोबल फायनान्शियल्सने शेअर्स साठी टार्गेट प्राईस 305 रुपये निश्चित केली आहे. प्रभुदास लीलाधर रिसर्चने टार्गेट प्राईस 344 रुपये ठेवली होती.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.