Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market Outlook : शेअर बाजाराची मोठी झेप, आता कोणता उच्चांक

Share Market Outlook : शेअर बाजाराने मोठी झेप घेतली आहे. बाजाराने नवीन उच्चांक गाठला आहे. मध्यंतरी ढेपाळलेली पारी सांभाळत बाजाराने जोरदार बॅटिंग केली. आता बाजार कोणता उच्चांक गाठणार हे पुढील आठवड्यात समोर येईल.

Share Market Outlook : शेअर बाजाराची मोठी झेप, आता कोणता उच्चांक
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 5:47 PM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) तेजीचे सत्र परतले आहे. मध्यंतरी ढेपाळलेली पारी जोरदार कामगिरीने शेअर बाजाराने भरुन काढली. गेला आठवडा तर शेअर बाजारासाठी शानदार राहिला. उच्चांकसोबतच अनेक कंपन्यांनी चांगली कामगिरी बजावली. बाजार अनेकदा हिंदोळ्यावर होता. मोठी लाट दिसली नसली तरी बाजाराने चमकदार कामगिरी केली. दोन प्रमुख निर्देशांक बीएसई निर्देशांक (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) यांनी उच्चांक गाठला. त्यामुळे सोमवारी 19 जून पासून पुढील आठवड्यात बाजार कोणती झेप घेतो, हे समोर येईल. गुंतवणूकदारांचा उत्साह सध्या शिगेवर आहे. पुढील आठवड्यात त्यांचे नशीब पालटू शकते.

सेन्सेक्सने तयार केला नवीन रेकॉर्ड पुढील आठवड्याकडे बघताना गेल्या आठवड्यातील कामगिरीवर नजर टाकणे आवश्यक आहे. शुक्रवारी बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर (Share Market Lifetime High)  बंद झाला. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सक्स 758.95 अंकांनी म्हणजे 1.21 टक्क्यांनी वधारला. तर शुक्रवारी सेन्सेक्स 466.95 अंकांनी म्हणजे 0.74 टक्क्यांनी वधारला. 63,384.58 अंकावर चढून बीएसईने इतिहास रचला.

निफ्टीने केला पराक्रम यापूर्वी 1 डिसेंबर 2022 रोजी निर्देशांक 63,284.19 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 137.90 अंकांनी म्हणजे 0.74 टक्के चढून 18,826 अंकावर पोहचून नवीन रेकॉर्ड केला. निफ्टीचा गेला रेकॉर्ड 18,812.50 अंक होता.

हे सुद्धा वाचा

पुढील आठवड्यात असा बदल पुढील आठवड्यात बाजाराचा मूड काय असेल, याचा अंदाज गुंतवणूकदार लावत आहेत. शेअर बाजारावर जागतिक बाजार, परदेशी गुंतवणूकदारांचा मूड, पावसाचा अंदाज याचा परिणाम होईल. गुंतवणूकदार डॉलरच्या तुलनेत रुपयाची कामगिरी आणि कच्चा तेलाचे भाव यावरही लक्ष ठेऊन आहेत. पावसाची चाल काय असेल, यावर पण बाजार प्रतिक्रिया देईल. नवीन उच्चांक गाठताना बाजारात नफेखोरांमुळे बाजाराची दिशा पूर्णपणे पालटते. बाजारात विक्रीच्या सत्राची भीती असते.

1000 हून 63 हजारांवर 1990 मध्ये पहिल्यांदा S&P BSE SENSEX 1000 अंकावर होता. तो आज 63,244 अंकावर आहे. म्हणजे या 33 वर्षोंमध्ये बीएसई सेन्सेक्समध्ये 60 पटींची उसळी घेतली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) हा भारताचा प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहे. 1990 मध्ये त्याची स्थापना झाली.

MRF ने रचला इतिहास

  • 1993 मध्ये एमआरएफच्या एका शेअरची किंमत 11 रुपये होती
  • 2000 मध्ये हा शेअर 2000 रुपयांवर होता
  • 2012 मध्ये एका शेअरची किंमत 10,000 रुपयांवर पोहचली
  • 2014 मध्ये एक शेअर 25,000 रुपयांवर पोहचला
  • 2016 मध्ये एका शेअरची किंमत 50,000 रुपये झाली
  • 2018 साली हा शेअर 75,000 रुपयांवर पोहचला
  • 13 जून 2023 रोजी इतिहास रचत या शेअरने 1 लाखांचा टप्पा ओलांडला

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.