Share Market : परतावा मिळेल सोन्यावाणी, शेअर बाजार असा रचणार इतिहास

Share Market : भारतीय शेअर बाजार लवकरच इतिहास रचण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची घौडदौड पाहता ही शक्यता दाट आहे. पण कधी येणार हा सुवर्णदिन? तुम्ही गुंतवणूक सुरु केली की नाही?

Share Market : परतावा मिळेल सोन्यावाणी, शेअर बाजार असा रचणार इतिहास
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 8:37 AM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (Share Market) जोरदार तेजीचे सत्र सुरु आहे. गुरुवारी बेंचमार्क इंडेक्स एनएसई निफ्टी 50 (Nifty50) व्यापारी सत्रात पहिल्यांदा 19,550 अंकांच्या पुढे सरकला. तर 30 शेअर असलेला बीएसई निर्देशांकाने(BSE Sensex) 66,050 अंकांचा टप्पा ओलांडला. भारतीय शेअर बाजार लवकरच इतिहास रचण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची घौडदौड पाहता ही शक्यता दाट आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते बाजार गगन भरारीचे संकेत देत आहे. म्हणजे बाजारात अजून तेजी येऊ शकते. बाजार नवीन उच्चांक रचू शकतो. पण कधी येणार हा सुवर्णदिन? तुम्ही गुंतवणूक सुरु केली की नाही? पण बँक निफ्टीत अनेकांना गुंतवणूक करताना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. कारण तरी काय?

आता नवीन टार्गेट काय शेअर बाजारातील तज्ज्ञांनुसार निफ्टी 50 लवकरच इतिहास रचणार आहे. टेक्निकल चार्टवर नजर टाकली तर निफ्टीला मजबूत पाठिंबा मिळत आहे. 19,171 अंकावर हा सपोर्ट मिळत आहे. तर रेजिस्टेंस 19,577 अंकावर दिसत आहे. पण काही बाबतीत हा तो खंडीत होताना ही दिसत आहे. त्यामुळे निफ्टी लवकरच 20 हजार अंकांचा टप्पा गाठेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सेन्सेक्सची मुसंडी बीएसई सेन्सेक्स हा भारतातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. तो पण मागे नाही. हा बाजार ही लवकरच नवीन टप्पा गाठण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स 66,000 अंकाचा टप्पा लिलया ओलांडेल असा अंदाज आहे. बाजारातील तज्ज्ञांनी तर त्यापेक्षा पुढचा अंदाज वर्तवला आहे. सेन्सेक्स 67,000 आणि 68,000 हजारांचा टप्पा गाठेल, असा दावा करण्यात येत आहे. सध्या बाजारात घसरणीचे पण सत्र सुरु आहे. त्यामुळे निफ्टीत 19,300 आणि सेन्सेक्समध्ये 64,500 पातळीवर सपोर्ट मिळू शकतो.

हे सुद्धा वाचा

बँक निफ्टीची कथा काय मार्केट एक्सपर्टनुसार, बँकिंग सेक्टरमध्ये पण तेजीचे सत्र दिसू शकते. बँकिंग इंडेक्समध्ये सध्या मंदीचे सत्र सुरु आहे. 45,000 अंकांचा टप्पा पार करताना बँक निफ्टीचा दमछाक होत आहे. त्यामुळे या इंडेक्सवर मंदीचा प्रभाव दिसत आहे. तर दुसरीकडे तेजी या इंडेक्सला मंदीच्या गर्तेतून बाहेर खेचत आहे. 44700 अंकाचा जोरदार पाठिंबा दिसत आहे. पण जर हा सपोर्ट बंद झाला तर ब्रेक डाऊन होऊन हा इंडेक्स 44500-44000 अंकापर्यंत खाली येईल. बाजारातील तज्ज्ञानुसार, बँक निफ्टीमध्ये व्यवहार करताना, गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी सावध राहणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात कोणताही निर्णय न घेता अभ्यासाअंतीच गुंतवणूक करावी.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.