भारतीय करताय बक्कळ कमाई, एफडी नाही तर आता या ठिकाणी करताय गुंतवणूक

Investment : भारतीय लोकं आता सोने किंवा एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडत नाहीयेत. चांगले रिर्टन कुठे मिळतील यासाठी प्रत्येकजण मार्ग शोधत असतो. बँक बाझारच्या आकडेवारीनुसार भारतीयांनी गुंतवणुकीचा नवा मार्ग शोधला आहे. कोणता आहे तो मार्ग जाणून घ्या.

भारतीय करताय बक्कळ कमाई, एफडी नाही तर आता या ठिकाणी करताय गुंतवणूक
Mutual Fund
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 8:02 PM

मुंबई : तुम्ही अजूनही एफडीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला कदाचित सध्याचा ट्रेंड माहित नसेल. कारण भारतीय आता भविष्यासाठी FD मध्ये गुंतवणूक करत नाहीयेत.  FD ऐवजी भारतीय पैसे कमवण्यासाठी आता इतर मार्गांनी गुंतवणूक करत आहेत. अजूनही अनेक जण सोने किंवा एफडीमध्ये गुंतवणूक करतात. पण भारतीय आता यापेक्षा ही जास्त रिटर्न मिळणाऱ्या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वाढली

बँकबाझारच्या आकडेवारीनुसार, देशात आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लोक फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा रिकरिंग डिपॉझिट्स (RD) पेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. पण म्युच्युअल फंड अजूनही देशातील बरेच लोकांना माहित नाही.

लोकांची बचत किंवा गुंतवणूक पद्धत पाहिली तर सुमारे 54% लोक म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यास प्राधान्य देत आहेत, तर 53% लोक अजूनही एफडीला प्राधान्य देतात. गुंतवणूकदारांचे सर्वोच्च प्राधान्य असेल तर आजही देशात सर्वाधिक पैसा बचत बँक खात्यांमध्ये गुंतवला जातो. सुमारे 77% लोक अजूनही बचत खात्यांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात.

स्टॉक आणि विमा

गुंतवणुकीच्या इतर पद्धती पाहिल्या तर सुमारे 43% लोकांना त्यांचे पैसे शेअर बाजारात गुंतवायला आवडतात. सुमारे 43% गुंतवणूकदार अजूनही विविध प्रकारच्या विमा योजनांमध्ये गुंतवणूक करतात.

सोन्याची क्रेझ घटली

सोन्यात गुंतवणुकीची क्रेझ देशांतर्गत कमी होताना दिसत आहे. सोने आणि इतर वस्तूंमध्ये, केवळ 27% लोक या पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने हे नेहमीच सर्वात सुरक्षित मानले जात असले तरी लोकांमध्ये त्याला ‘सॉलिड कॅश’ असेही म्हटले जाते. सोन्याप्रमाणे, सुमारे 27% लोक EPF आणि PPF सारख्या भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करतात.

क्रिप्टोसारखी नवीन गुंतवणूक साधनेही बाजारात आली आहेत. सुमारे 23% लोकांना क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करायची आहे, तर केवळ 19% लोकांना रिअल इस्टेट आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आवडतो.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.