मुंबई : तुम्ही अजूनही एफडीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला कदाचित सध्याचा ट्रेंड माहित नसेल. कारण भारतीय आता भविष्यासाठी FD मध्ये गुंतवणूक करत नाहीयेत. FD ऐवजी भारतीय पैसे कमवण्यासाठी आता इतर मार्गांनी गुंतवणूक करत आहेत. अजूनही अनेक जण सोने किंवा एफडीमध्ये गुंतवणूक करतात. पण भारतीय आता यापेक्षा ही जास्त रिटर्न मिळणाऱ्या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत.
बँकबाझारच्या आकडेवारीनुसार, देशात आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लोक फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा रिकरिंग डिपॉझिट्स (RD) पेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. पण म्युच्युअल फंड अजूनही देशातील बरेच लोकांना माहित नाही.
लोकांची बचत किंवा गुंतवणूक पद्धत पाहिली तर सुमारे 54% लोक म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यास प्राधान्य देत आहेत, तर 53% लोक अजूनही एफडीला प्राधान्य देतात. गुंतवणूकदारांचे सर्वोच्च प्राधान्य असेल तर आजही देशात सर्वाधिक पैसा बचत बँक खात्यांमध्ये गुंतवला जातो. सुमारे 77% लोक अजूनही बचत खात्यांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात.
गुंतवणुकीच्या इतर पद्धती पाहिल्या तर सुमारे 43% लोकांना त्यांचे पैसे शेअर बाजारात गुंतवायला आवडतात. सुमारे 43% गुंतवणूकदार अजूनही विविध प्रकारच्या विमा योजनांमध्ये गुंतवणूक करतात.
सोन्यात गुंतवणुकीची क्रेझ देशांतर्गत कमी होताना दिसत आहे. सोने आणि इतर वस्तूंमध्ये, केवळ 27% लोक या पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने हे नेहमीच सर्वात सुरक्षित मानले जात असले तरी लोकांमध्ये त्याला ‘सॉलिड कॅश’ असेही म्हटले जाते. सोन्याप्रमाणे, सुमारे 27% लोक EPF आणि PPF सारख्या भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करतात.
क्रिप्टोसारखी नवीन गुंतवणूक साधनेही बाजारात आली आहेत. सुमारे 23% लोकांना क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करायची आहे, तर केवळ 19% लोकांना रिअल इस्टेट आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आवडतो.