भारतात ई-कॉमर्स मार्केटमध्ये खूप वेगाने वाढ, 2030 पर्यंत बाजार 40 अब्ज डॉलरचा होणार

भारतातील टायर -3, आणि टायर -4 शहरे अतिशय वेगाने डिजिटल केली जात आहेत. ग्रामीण भारतातही इंटरनेट पोहोचलेय आणि उर्वरित भागात त्याच्या पोहोचण्याचा वेग खूप जास्त आहे. इंटरनेटच्या वापरामुळे तेथील ग्राहकांच्या वागणुकीत आणि पद्धतीमध्येही बरेच बदल झालेत.

भारतात ई-कॉमर्स मार्केटमध्ये खूप वेगाने वाढ, 2030 पर्यंत बाजार 40 अब्ज डॉलरचा होणार
e commerce
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 5:22 PM

नवी दिल्लीः E-Commerce in India: भारतातील ई-कॉमर्सची बाजारपेठ खूप वेगाने वाढत आहे. एका अहवालानुसार, 2030 पर्यंत भारतातील ई-कॉमर्सचं आकार 40 अब्ज डॉलरपर्यंत वाढेल. 2019 मध्ये ते फक्त 4 अब्ज डॉलर्स होते. या विकासदरामागे डिजिटल क्रांती हे एक मोठे कारण आहे. भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या खूप वेगाने वाढत आहे. यामुळेच ऑनलाईन शॉपिंगमध्ये बऱ्यापैकी तेजी दिसून येत आहे.

भारतातील टायर -3, आणि टायर -4 शहरांमध्ये अतिशय वेगाने डिजिटल क्रांती

भारतातील टायर -3, आणि टायर -4 शहरे अतिशय वेगाने डिजिटल केली जात आहेत. ग्रामीण भारतातही इंटरनेट पोहोचलेय आणि उर्वरित भागात त्याच्या पोहोचण्याचा वेग खूप जास्त आहे. इंटरनेटच्या वापरामुळे तेथील ग्राहकांच्या वागणुकीत आणि पद्धतीमध्येही बरेच बदल झालेत. ते आता ऑनलाईन खरेदीकडे आकर्षित झालेत. किरकोरळ बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय किरकोळ बाजारात ई-कॉमर्ससाठी भरपूर क्षमता आहे.

2026 पर्यंत बाजार 20 अब्ज डॉलर होणार

सल्लागार फर्म केर्नीच्या अहवालानुसार, 2019 मध्ये भारतातील ई-कॉमर्स बाजाराची किंमत 4 अब्ज डॉलर्स होती. 2026 पर्यंत त्याची किंमत 20 अब्ज डॉलर्स असेल, तर 2030 पर्यंत ती 40 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या अहवालात म्हटले आहे की, लाईफस्टाईल रिटेल मार्केट 2019 मध्ये 90 अब्ज डॉलर्सचे होते. त्याची किंमत 2026 पर्यंत 156 अब्ज डॉलर असेल, तर 2030 पर्यंत ती 215 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल. यामध्ये परिधान, पादत्राणे, फॅशन अॅक्सेसरीज, कॉस्मेटिक, लहान उपकरणे आणि घरगुती राहणीमान यांचा समावेश आहे.

सध्या रिटेलमध्ये ई-कॉमर्सचे केवळ 4% योगदान

केर्नीच्या अहवालात म्हटले आहे की, सध्या किरकोळ बाजारात ई-कॉमर्सचे योगदान केवळ 4 टक्के आहे. 2030 मध्ये हे प्रमाण 19 टक्क्यांपर्यंत वाढेल. या अहवालात असेही म्हटले आहे की, 2026 पर्यंत भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 110 कोटी पार करेल. यातील एक तृतीयांश लोकांना ऑनलाईन शॉपिंगमध्ये खूप रस असेल.

संबंधित बातम्या

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCSने इतिहास रचला, बाजारमूल्य थेट 13 लाख कोटींच्या पार

खूशखबर! पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार, 2000 ऐवजी 4000 मिळणार, सरकारची नेमकी योजना काय?

India’s e-commerce market is growing rapidly, reaching market 40 billion by 2030

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.