रेकॉर्ड ब्रेक: देशाची तिजोरी भरली, परकीय चलन साठा 611 अब्ज डॉलर्सच्या पुढे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) अर्थात आरबीआयने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आलीय.

रेकॉर्ड ब्रेक: देशाची तिजोरी भरली, परकीय चलन साठा 611 अब्ज डॉलर्सच्या पुढे
foreign currency
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 11:52 PM

मुंबई: 9 जुलै 2021 रोजी संपुष्टात आलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves/Forex Reserves) 1.883 अब्ज डॉलर्सने वाढून 611.895 अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) अर्थात आरबीआयने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आलीय.

देशाचा परकीय चलन साठा 1.013 अब्ज डॉलर्सने वाढून 610.012 अब्ज डॉलरवर

रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार, 2 जुलै रोजी संपलेल्या आधीच्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 1.013 अब्ज डॉलर्सने वाढून 610.012 अब्ज डॉलरवर गेला. 25 जून रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 5.066 अब्ज डॉलरने वाढून 608.999 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. यापूर्वी 18 जून रोजी संपुष्टात आलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 4.418 अब्ज डॉलरने घसरून 603.933 अब्ज डॉलर्सवर आला.

एफसीएमध्ये 1.297 अब्ज डॉलर्सची वाढ

रिझव्‍‌र्ह बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, अहवालात परकीय चलन साठ्यात वाढ होण्याचे कारण म्हणजे परकीय चलन मालमत्ता म्हणजे एफसीए (Foreign Currency Assets) झालेली वाढ आहे. या काळात एफसीए 1.297 अब्ज डॉलरने वाढून 568.285 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. परकीय चलन मालमत्ता, डॉलरच्या रूपात दाखवलेल्या विदेशी विनिमय साठ्यांमध्ये ठेवलेल्या युरो, पाउंड आणि येन यांसारख्या इतर विदेशी चलनांच्या किमतीत वाढ किंवा घट झाल्याचा परिणाम देखील समाविष्ट आहे.

सोन्याचा साठा 36.956 अब्ज डॉलर्सवर पोहोचला

आकडेवारीनुसार, या काळात सोन्याचा साठे 5.84 कोटी डॉलर्सने वाढून 36.956 अब्ज डॉलर्सवर गेलेत. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सह एसडीआर म्हणजेच स्पेशल ड्रॉईंग राईट्स (Special Drawing Rights) 1.547 अब्ज डॉलर्स झाले. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, अहवालाच्या आठवड्यात आयएमएफकडे भारताची परकीय चलन साठा 30 लाख डॉलर्सने वाढून 5.107 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या

विजय माल्ल्याचे शेअर्स विकून बँकांना 792 कोटी मिळाले, 58 टक्के नुकसानाची झाली भरपाई

Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत घसरण; उच्च स्तरापासून अजूनही 7,945 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा

indias forex reserves rise by usd 1 88 billion to record high of usd 611

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.