Expensive Stocks : एका शेअरसाठी मोजा इतके रुपये, या महागड्या स्टॉकमुळे पळेल तोंडचे पाणी

Expensive Stocks : शेअर बाजारात एमआरएफच्या स्टॉकने इतिहास रचला आहे. एक लाखांचा टप्पा या स्टॉकने गाठला आहे. या सोबतच हे पण शेअर सर्वात महागडे आहेत. यातील एका शेअरमध्ये तर एखादी दुचाकी खरेदी करता येऊ शकते.

Expensive Stocks : एका शेअरसाठी मोजा इतके रुपये, या महागड्या स्टॉकमुळे पळेल तोंडचे पाणी
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 6:37 PM

नवी दिल्ली : भारतातील सर्वात महागड्या स्टॉकची (Expensive Stock) तर देशातच नाही तर जगभरात चर्चा झाली. एफआरएफच्या स्टॉकने एक लाखांचा पल्ला गाठलाच नाही तर तो पार ही केला. एक नवीन इतिहास या स्टॉकने भारतीय शेअर बाजारात (Share Market) नोंदवला. टायर तयार करणारी कंपनी एमआरएफने (MRF) सर्वच दिग्गज कंपन्यांना मागे सोडले. हा स्टॉक सध्या गगनाला भिडला आहे. पण केवळ हाच महागडा स्टॉक नाही तर सोबतच हे पण शेअर सर्वात महागडे आहेत. यातील एका शेअरमध्ये तर एखादी दुचाकी खरेदी करता येऊ शकते.

भारतातील 10 सर्वात महागडे स्टॉक हे आहेत

1. एमआरएफ (MRF)  एमआरएफ स्टॉकने (MRF Stock) मंगळवारी शेअर बाजारात इतिहास रचला. एक लाख रुपयांना गवसणी घालणारा हा भारतातील पहिला स्टॉक ठरला. हा स्टॉक BSE वर अगोदर 98,939.70 रुपये प्रति शेअरवर बंद झाला होता. 13 जून रोजी सकाळी हा शेअर 99,500 रुपयांवर उघडला आणि सकाळच्याच सत्रात तो 1,00,300 रुपयांपर्यंत झेपावला. त्याने एकाच दिवशी 800 रुपये प्रति शेअरची हनुमान उडी घेतली. एक लाखांपेक्षा जास्त किंमत असलेला भारतीय शेअर बाजारातील एकमेव स्टॉक ठरला. एका वर्षात या स्टॉकमध्ये तुफान तेजी दिसून आली.

हे सुद्धा वाचा

2. हनीवेल ऑटोमेशन (Honeywell Automation)  इलेक्ट्रॉनिक-इंस्ट्रुमेंटेशन अँड प्रोसेस कंट्रोल एक्विमेंट निर्माण तयार करणाऱ्या या कंपनीचा स्टॉक पण महागडा आहे. हा शेअर 41,622 रुपयांना आहे. या शेअरचा 52-आठवड्यांचा उच्चांक 44,347.15 रुपये आहे.

3. पेज इंडस्ट्रीज (Page Industries) इनरविअर कंपनी पेज इंडस्ट्रीजचा शेअरने पण मोठी झेप घेतली आहे. या शेअरमध्ये शंभर टक्के तेजीचे वारे आहे. हा शेअर 38,411 रुपयांवर व्यापार करत आहे. भारतातील सर्वात महागड्या शेअरच्या सूचीत हा स्टॉक तिसऱ्या क्रमांकावर हे.

4. 3M इंडिया (3M India)  इंडस्ट्रियल एक्विमेंट तयार करणाऱ्या 3M India या कंपनीचा स्टॉक पण आघाडीवर आहे. या शेअरमध्ये 2.31 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. हा शेअर सध्या 27,570 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. यापूर्वी हा स्टॉक गेल्या सत्रात 26,947 रुपयांवर व्यापार करत होता.

5. श्री सिमेंट्स (Shree Cement) सिमेंट उद्योगात अनेक कंपन्या आहेत. त्यांचं भांडवल पण मोठं आहे. पण श्री सिमेंट्स या सिमेंट कंपनीने शेअर बाजारात आघाडी घेतली आहे. हा स्टॉक महागडा आहे. सध्या या शेअरमध्ये 0.20 टक्क्यांची तेजी दिसून आली. 26,215.05 रुपयांवर हा स्टॉक व्यापार करत आहे.

6. नेस्ले इंडिया (Nestle India) या एफएमसीजी स्टॉकमध्ये 0.82 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा स्टॉक 22,677 रुपयांच्या स्तरावर ट्रेडिंग करत आहे. गेल्या व्यापारी सत्रात हा स्टॉक 22,492.60 रुपयांवर होता.

7. अबॉट इंडिया (Abott India)  या शेअरमध्ये घसरण झाली आहे. सध्या हा शेअर 0.29 टक्क्यांनी घसरला असून तो 22,091.20 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. यापूर्वीच्या सत्रात या शेअरचा भाव 22,155.70 रुपये होता.

8. Bosch या स्टॉकमध्ये 0.41 टक्के तेजी दिसून आली आहे. हा स्टॉक सध्या 19,140.80 रुपयांवर व्यापार करत आहे. यापूर्वीच्या सत्रात या शेअरचा भाव 19,060.10 रुपये होता.

9. प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजिन (Procter & Gamble Hygiene) प्रॉक्टर अँड गॅम्बलची उत्पादन अनेक घरात दिसतात. हायजिन उत्पादनात ही कंपनी अग्रेसर आहे. सध्या या कंपनीच्या शेअरमध्ये 0.018 टक्क्यांची घसरण दिसून येत असून 13,975.10 रुपयांवर हा शेअर ट्रेडिंग करत आहे.

10. लक्ष्मी मशीन वर्क्स (Lakshmi Machine Works) हा शेअर पण महागडा आहे. या शेअरमध्ये 0.97 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. सध्या हा शेअर 12,386.20 रुपयांवर ट्रेडिंग होत आहे.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.