नवी दिल्ली : जग भलेही रशिया युक्रेन यांच्यातील वादामध्ये अडकलेलं आहे. परंतु भारतामध्ये नव्या काळातील कंपनी धडाधड यूनिकॉर्न (Unicorn) क्लब मध्ये सहभागी होताना दिसत आहेत. या संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा भारतीय स्टार्टअप (startup) खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जमा करत आहे, यांचे व्हॅल्युएशन सुद्धा गगनाला भिडत आहेत. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात घरगुती स्टार्टअप ने 3.7 अब्ज डॉलरपेक्षा जास्तची फंडिंग (Funding) जमा केली आणि वर्षाच्या पहिल्या 2 महिन्यांमध्येच यूनिकॉर्न क्लब मध्ये नवीन सदस्य देखील सहभागी झाले आहेत. खरंतर स्टार्टअप इकोसिस्टीम ना सरकारद्वारे मिळत असलेले समर्थन आणि भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात मिळणाऱ्या नवीन आ शा या कारणामुळे गुंतवणूकदार आपला सगळा पैसा नव्याने उदयास येणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना मध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी इंटरेस्ट घेत आहेत.
रशिया – युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे शेअर बाजारांमध्ये जरी आपल्याला नकारात्मक परिणाम तसेच घसरण पाहायला मिळत असली तरी महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे परंतु या सगळ्या घटना दरम्यान भारतीय स्टार्टअप पुढे आगेकूच करत आहे. भारतात नव्या काळातील कंपन्या वेगाने यूनिकॉर्न क्लब मध्ये सहभागी होताना दिसून येत आहे.
रूस-यूक्रेन की जंग से भले ही शेयर बाजार धड़ाम से गिर रहे हों, महंगाई बेलगाम होती जा रही हो, लेकिन इस बीच भारतीय स्टार्टअप के आगे बढ़ने की रफ्तार नहीं थम रही. भारत में नए दौर की कंपनियां धड़ाधड़ यूनिकॉर्न क्लब में दाखिल हो रही हैं.@shubhanshkhanna @manuiimc pic.twitter.com/lyNamADhDm
— Money9 (@Money9Live) March 4, 2022
फेब्रुवारी महिन्यात पाच स्टार्टअप यांनी यूनिकॉर्नचा दर्जा मिळवला आहे.यूनिकॉर्न म्हणजे 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त व्हॅल्युएशन असणाऱ्या स्टार्टअप. यादी जानेवारीमध्ये चार युनिकॉर्न क्लब मध्ये सहभागी झाले होते तर या वर्षाच्या सुरुवातीलाच दोन महिन्यांमध्ये एकंदरीत देशात नऊ स्टार्टअप यूनिकॉर्न बनले आहेत. 2021 मध्ये 44 कंपन्यांनी एक अब्ज डॉलरची व्हॅल्युएशन मिळवली होती.
PwC च्या एका रिपोर्टनुसार या वर्षी 50 पेक्षा जास्त भारतीय स्टार्टअप यूनिकॉर्न क्लब मध्ये सहभागी होऊ शकतात. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जर या सगळ्या घटनांकडे पाहायला गेल्यास जगभरातील गुंतवणूकदार यांचा विश्वास भारतीय कंपनीच्या प्रति वाढताना दिसून येत आहे. वर्षी 2019 च्या शेवटच्या महिन्या मध्ये या स्टार्टअप ने 10 अब्ज डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक केले आहे वर्ष 2022 च्या पहिल्या महिन्यातच 4.6 अब्ज डॉलर भारतीय स्टार्टअप मध्ये लावण्यात आले आहे.
हल्ली बाजारामध्ये स्टार्टअपचा एक वेगळेच वातावरण तयार झालेला आहे. प्रत्येक जण स्टार्टअप बिझनेस होण्यासाठी प्रयत्नशील आहे असे चित्र दिसून येत आहे. झोमॅटो,पेटीएम, पोलिसीबजार सारखे अनेक या यादीत आहेत. मजबूत फक्कड रिटर्न्स मिळण्याच्या अपेक्षेने सर्व साधारण गुंतवणूकदार यामध्ये पैसा गुंतवणुकीसाठी पुढे येत आहे परंतु हल्ली शेअर बाजाराची स्थिती समाधानकारक नाहीये. अनेक जण शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करण्याचा धोका पत्करत नाहीये. या सगळ्या गोष्टींमुळे स्टार्टअप व्हॅल्युएशन आणि त्याच्या प्रॉफिट बद्दल अनेक चिंता देखील वर्तवण्यात येत आहेत.
इतर बातम्या :