भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर, जून महिन्यात औद्योगिक उत्पादन क्षेत्राचा विकासदर 13.6 टक्के
Industrial Growth Rate | एप्रिल आणि मे महिन्यात लॉकडाऊनमुळे देशाच्या बहुतांश भागातील उद्योग ठप्प होते. औद्योगिक विश्वाला याचा मोठा फटका बसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याची आकडेवारी आता समोर आली आहे. कारण जून महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा विकासदर केवळ 13.6 टक्के इतकाच नोंदवण्यात आला आहे. मात्र, कोरोनाची असाधारण परिस्थिती पाहता ही आकडेवारीही परिस्थिती सुधारत असल्याचे द्योतक मानली जात आहे.
मे महिन्यात हा विकासदर 29.3 टक्के इतका होता. एप्रिल आणि मे महिन्यात लॉकडाऊनमुळे देशाच्या बहुतांश भागातील उद्योग ठप्प होते. औद्योगिक विश्वाला याचा मोठा फटका बसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) गुरुवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, जून 2021 मध्ये देशाचे निर्मिती क्षेत्राचा विकासदर 13 टक्के होता. औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये निर्मिती क्षेत्राचे 77.63 टक्के योगदान असल्याने, या निर्देशांकांच्या दमदार सुधारलेल्या पातळीसाठी निर्मिती क्षेत्राची ही कामगिरीच महत्त्वपूर्ण ठरली आहे. निर्मिती क्षेत्राबरोबरीनेच खाणकाम क्षेत्राने 23.1 टक्क्य़ांचा वृद्धीदर नोंदविला, तर जूनमध्ये वीजनिर्मिती क्षेत्राने 8.3 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.
Industrial production grew by 13.6% in June 2021: Ministry of Statistics & Programme Implementation
— ANI (@ANI) August 12, 2021
विकासदर कमी पण परिस्थिती सुधारत असल्याचे संकेत?
औद्योगिक उत्पादन क्षेत्राचा विकासदर अवघा 13 टक्के नोंदवला गेला असला तरी फार चिंता करण्याचे कारण नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातून सावरत, कारखानदारी आणि उत्पादन क्षमता पुन्हा रुळावर येत असल्याचे हे द्योतक मानले जात आहे.
जून 2021 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने 122.6 अंशांची पातळी गाठली, जी करोना-पूर्व काळाच्या म्हणजे जून 2019 मधील या निर्देशांकाच्या 129.3 अंश या पातळीपेक्षा फार दूर नाही, हे स्पष्ट होते. जून 2020 मध्ये मात्र या निर्देशांकाचा स्तर 107.09 अंशापर्यंत खाली आला होता.
इतर बातम्या:
Gold Silver price today: सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या आजचा दर
Gold Hallmarking: सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा ग्राहकांना काय फायदा होणार?
Gold Hallmarking: सोने हॉलमार्किंगचा नवा नियम लांबणीवर पडणार? वाचा नेमकं कारण