Inflation: महागाईनं खिसा फाडला! किरकोळ पाठोपाठ होलसेल बाजारातही महागाईचा उच्चांकी दर

Wholesale Market Inflation Rate: फेब्रुवारीत होलसेल बाजारातील महागाई दर (Inflation Rate) हा 13.11 टक्के इतका होता. मात्र मार्च महिन्यामध्ये या दरात लक्षणीय वाढ झाली.

Inflation: महागाईनं खिसा फाडला! किरकोळ पाठोपाठ होलसेल बाजारातही महागाईचा उच्चांकी दर
वाढत्या महागाईत चिंता वाढवणारी बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 2:06 PM

नवी दिल्ली : महागाई कमी होण्याचं नाव घेत नाहीय. एकीकडे किरकोळ बाजारातील (Retail Market Inflation) महागाईचा दर हा वाढतच चाललाय तर दुसरीकडे होलसेल बाजारातही महागाईनं (Wholesale Market) उच्चांक काढलाय. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात होलसेल बाजारातील महागाईचा दर हा दीड टक्क्यांपेक्षा जास्तीनं वाढलेला आहे. फेब्रुवारीत होलसेल बाजारातील महागाई दर (Inflation Rate) हा 13.11 टक्के इतका होता. मात्र मार्च महिन्यामध्ये या दरात लक्षणीय वाढ झाली. मार्च महिन्यात होलसेल बाजारातील महागाई दर हा तब्बल 14.55 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर जानेवारी महिन्यामध्ये हाच दर 12.96 टक्के इतका होता. होलसेल बाजारातील महागाई दर वाढणं ही चिंताजनक बाब मानली जाते आहे. कारण याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जगण्यावर होणार आहे. होलसेल बाजारीत वस्तूचे दर महागले, तर किरकोळ बाजारातील वस्तूंच्या किंमती थेट महागणार आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम सामान्यांच्या बजेटवर होताना पाहायला मिळणार आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचं :

पहिल्या तीन महिन्यात महागाईनं बेहाल करणारी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च या दरम्यान, कशापद्धतीनं होलसेल बाजारातील महागाई वाढत गेली आहे, हे अधोरेखित होतंय. तसंच आता वाढलेली महागाई पुन्हा नियंत्रणात कशी आणायची असा प्रश्न उभा ठाकलाय.

  1. जानेवारी : 12.96%
  2. फेब्रुवारी : 13.11%
  3. मार्च : 14.55 %

खाणंपिणं महागलं

महिन्याची आकडेवारी पाहिली, तर होलसेल बाजारात खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर हे 8.47 वरुन 8.71 वर जाऊन पोहोचले आहे. इंधन आणि उर्जा क्षेत्रात 31. 50 टक्क्यांवरुन थेट 34.52 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

बटाट्यांवर परिणाम

बटाट्यांच दर हे बाजारात कमालीचे वाढले आहेत. 14.78 वरुन 24.62 इतकी जबरदस्त वाढ बटाट्यांच्या किंमतीवर दिसून आली आहे. तर दुसरीकडे कांद्याच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, मांसाहर करणाऱ्यांसाठीही दिलासादायक वृत्त नाही. अंडी, मांस यांच्या किंमतीही वाढल्याच आहेत.

भाज्यांचा दिलासा?

कच्च्या तेलाच्या किंमती सगळ्यावरच परिणाम करत असून वेगानं महागाईचा दर वाढतोय. कमोडिटी इंडेक्स WPI नुसार 2.69 इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे. तर भाज्यांच्या होलसेल बाजारातील दरात घट नोंदवण्यात आली आहे. 26.93 वरुन 19.88 इतका दर भाज्यांच्या होलसेल बाजारातील दरांत नोंदवला गेलाय.

किरकोळ बाजारही महागलेलाच!

दरम्यान, याआधीच किरकोळ बाजारातही उच्चांकी दर पाहायला मिळालेला आहे. जवळपास सात टक्क्यांच्या जवळ किरकोळ महागाईचा दर पोहोला आहे. त्यामुळे आता ही महागाई नियंत्रित कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चार टक्के किरकोळ महागाईचा दर ठेवण्याचं आरबीआयचं ध्येय आहे. मात्र हा दर आवाक्यात येण्याऐवजी वाढतच चालल्यानं सगळ्यांच गोष्टींवर ताण पडतोय. सर्वसामान्य माणसासाठी त्यामुळे जगायचं कसं, असा प्रश्नही निर्माण होऊ लागलाय. सध्या किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा 6.95 टक्के इतका आहे.

कामाच्या इतर बातम्या :

महागाईचे घाबरवणारे आकडे! किरकोळ बाजारातील महागाई गेल्या 17 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर

बँकेच्या वेळापत्रकामध्ये बदल आजपासून 9 वाजता सुरू होणार बँका

एसबीआयकडून ग्राहकांना मोठे गिफ्ट; अवघ्या 6.65 टक्के व्याजदराने मिळतंय कर्ज, महिलांना विशेष सूट

पाहा व्हिडीओ : गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांचा धक्कादायक व्हिडीओ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.