देशात महागाई आणखी वाढणार; ‘ही’ आहेत प्रमुख कारणं

देशामध्ये महागाई आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. येणाऱ्या काळात नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसू शकतो.

देशात महागाई आणखी वाढणार; 'ही' आहेत प्रमुख कारणं
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 2:08 PM

नवी दिल्ली – देशामध्ये महागाई आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. येणाऱ्या काळात नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसू शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, पेट्रोल,डिझेल आणि गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकारने  पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याने काही प्रमाणात इंधनाचे दर कमी झाले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर भडकण्याची शक्यता आहे. इंधनाचे दर वाढल्यास सर्व वस्तूंची किमंत वाढते. त्यामुळे येणाऱ्या काळात महागाई आणी वाढू शकते.

अमेरिका, चीन, जपानलाही महागाईचा फटका 

वाढती महागाई ही केवळ एकट्या भारताचीच समस्या नसून, अमेरिका, चीन आणि जपान सारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे देखील महागाईने कंबरडे मोडले आहे. जपानमध्ये गेल्या काही महिन्यात महागाई उच्चा पातळीवर पोहोचली आहे. माहागाई नियंत्रणात आणून अर्थव्यवस्था बळकट बनवण्यासाठी  जपान सरकारकडून 490 अब्ज डॉलर (56 ट्रिलियन येन) च्या प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेतून डबघाईस आलेल्या उद्योगांना आर्थिक पाठबळ पुरवले जाणार आहे. तसेच अमेरिकेकडून देखील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली जात आहेत.

महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न

भरताबाबत बोलायचे झाल्यास भारताची मध्यवर्ती बँक असलेली आरबीआय आणि केंद्राकडून महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपययोजना आखण्यात येत आहेत. उत्पादन शुल्क कमी करून पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. मध्यंतरी खाद्य तेलाच्या किमतीमध्ये व्रिकमी वाढ झाली होती. परंतु  त्यावरील शुल्क देखील कमी करण्यात आल्याने त्याच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.

संबंधित बातम्या 

ऑनलाईन कर्ज प्रकरणात फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयचे मोठे पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय

PHOTO | IFSC: IFSC कोड म्हणजे काय? आर्थिक व्यवहारासाठी का आहे आवश्यक? जाणून घ्या प्रत्येक अंकाचा अर्थ

कोलकातामधील रियल इस्टेट कंपनीवर आयकर विभागाचा छापा; 200 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा संशय

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.