टेलिकॉम क्षेत्राचे रुपडे पलटणार; ‘5G’बाबत माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले वैष्णव?
तंत्रज्ञानाच्या (Technology) विकासासाठी आपण सतत पुढे असले पाहिजे. टेलिकॉम सेक्टरचा (Telecom Sector) जर विकास करायचा असेल तर सध्या असलेल्या नियामक फ्रेमवर्कमध्ये् आमूलाग्र बदल करावा लागेल, असं माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
तंत्रज्ञानाच्या (Technology) विकासासाठी आपण सतत पुढे असले पाहिजे. टेलिकॉम सेक्टरचा (Telecom Sector) जर विकास करायचा असेल तर सध्या असलेल्या नियामक फ्रेमवर्कमध्ये् आमूलाग्र बदल करावा लागेल. त्या दृष्टीने सरकारची तयारी सुरू आहे. सरकारला उद्योगाशी एक भागीदार म्हणून संवाद साधायचा असल्याचे प्रतिपादन दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी केले आहे. ते ‘टीडीसॅट’च्या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, इथे प्रत्येक जण व्यवस्थेत अडकला आहे. त्यामुळे आपण फार दूरवरची मजल मारू शकत नाहीत. मात्र आता आपल्याला कायदेशीर चौकट, नियामक अंमलबजावणी चौकट आणि आपल्या सरकारी संस्थांची मानसिकता, लोकांचे प्रशिक्षण यामध्ये बदल घडवून आणावा लागणार आहे. आज आपण डिजिटल जगात राहतो त्या पार्श्वभूमीवर टेलिकॉम क्षेत्रात काही बदल करणे गरजेचे आहे.
5 जी तत्रज्ञानाला प्राधान्य
पुढे बोलताना अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, आपल्याला 5 जी, 6 जी तंत्रज्ञानात जगात सर्वात पुढे राहवे लागणार आहे. जेव्हा जगात 2 जी 3 जी तंत्रज्ञान आले, तेव्हा आपण त्यामध्ये सर्वात मागे होते. मात्र आता आपल्याला मागे राहून चालणार नाही. आपण प्रत्येकवेळी म्हणतो भारत तरुणांचा देश आहे. भारत प्रतिभावंत लोकांचा देश आहे. मग अशावेळी जर आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे राहत असू, तर आपण आपल्याला प्रतिभावान मानावे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
‘भारत प्रतिभावान व्यक्तींचा देश’
सध्या आम्ही टेलिकॉम क्षेत्रामध्ये नवे तंत्रज्ञान आणू इच्छितो. याच पार्श्वभूमीवर आयआयटी चेन्नई, आयआयटी कानपूर, आयआयटी मुंबई आणि आयआयटी बंगळुरूमध्ये संशोधन सुरू आहे. पूर्वी आपल्याला टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित अनेक वस्तू आयात कराव्या लागत होत्या, मात्र आता चित्र बदलले आहे. भारतातील तब्बल 35 टेलिकॉम कंपन्या या आपले उत्पन्न आता निर्यात करू लागल्या आहेत. मला अशी अशा की आपण 5 जी, 6 जी तंत्रज्ञात देखील सर्वात पुढे राहू असं देखील यावेळी वैष्णव यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या
Russia-Ukraine war : भारतीय स्टील उद्योगाची चांदी; निर्यात 76 टक्क्यांनी वाढली
वाढत्या ग्रामीण बेरोजगारीचा थेट वाहन उद्योगाला फटका; कंपन्यांचे शेअर्सही कोसळले
गौतम अदानी खरेदी करणार अनिल अंबानींची कंपनी; रिलायन्स कॅपिटलसाठी या तारखेपर्यंत आहे बोली