Infosys Dividend | मोठी अपडेट! केवळ या शेअरधारकांना लागणार डिव्हिडंडची लॉटरी
Infosys Dividend | इन्फोसिसने डिव्हिडंड देण्याची घोषणा केली. त्यात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती हिची संपत्ती कितीने वाढेल याची माहिती समोर आली होती. आता इन्फोसिसने डिव्हिडंट कोणत्या शेअरधारकाला मिळेल याची महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार, केवळ याच शेअरधारकांना लाभांश देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : बंगळुरु येथील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसने शेअरधारकांना पुन्हा एकदा लाभांशाची घोषणा केली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 साठी अंतिरम लाभांश (Interim Dividend) देण्याची घोषणा केलेली आहे. तर ताज्या अपडेटनुसार, या अंतरिम लाभांशाची एक्स आणि रेकॉर्ड डेट आज, 25 ऑक्टोबर ही आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना एक्स डिव्हिडंड जाहीर केला आहे, ही रक्कम 6 नोव्हेंबर रोजी त्यांच्या खात्यात जमा होईल. पण रेकॉर्ड वा एक्स डेट पर्यंत कंपनीच्या बँलनशीटमध्ये ज्या शेअरधारकांकडे हा स्टॉक असेल, त्यांनाच केवळ अंतरिम लाभांशाचा फायदा मिळेल. 25 ऑक्टोबरच्या दिवशी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीची बँलन्स शीटमधील उपलब्ध आकडेवारीनुसार, ज्या शेअरहोल्डर्सकडे हे शेअर असतील त्यांनाच केवळ अंतरिम डिव्हिडंडची रक्कम मिळेल.
Infosys च्या लाभांशाची माहिती
कंपनीने या लाभांशाची माहिती दिली आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष 2023-24 साठी अंतरिम लाभांश जाहीर करण्यात आला आहे. कंपनीने 18 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या मदतीने अंतरिम डिव्हिडेंड देण्याची घोषणा केली आहे. या अंतरिम डिव्हिडंडची एक्स आणि रेकॉर्ड डेट 25 ऑक्टोबर आहे. या 6 नोव्हेंबर रोजी डिव्हिडंड शेअरधारकांच्या खात्यात जमा होईल.
इन्फोसिसने असा दिला लाभांश
25 ऑक्टोबर 2000 रोजी कंपनीने आतापर्यंत 49 वेळा डिव्हिडंडची घोषणा केली आहे. Trendlyne च्या आकडेवारीनुसार, इन्फोसिसने गेल्या 12 महिन्यात आतापर्यंत 52 रुपये प्रति इक्विटी शेअरप्रमाणे डिव्हिडंड दिला आहे.
अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत भर
2023 च्या पहिल्या तिमाही निकालात कंपनीने 17.50 रुपये प्रति शेअरचा लाभांश जाहीर केला होता. इन्फोसिसने प्रति शेअर 17.50 रुपयांचे अंतरिम लाभांश 2 जून 2023 रोजी जाहीर केले होते. त्यामुळे अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत 68 कोटी रुपयांची भर पडली होती. या नवीन लाभांशामुळे मूर्ती यांच्या संपत्तीत 70 कोटींहून अधिकची भर पडेल.
Infosys च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल कसा
30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 6212 कोटी रुपयांचा एकत्रित नफा कमावला आहे. तरीही अंदाजापेक्षा नफ्याचे गणित कमी आले आहे. याशिवाय कंपनीच्या महसूलात 2.8 टक्क्यांची वाढ दिसून आली. कंपनीचा महसूल 38994 कोटी रुपयांवर पोहचला.