RBI च्या निर्देशानंतर बँकांनी इंटरचेंज फी वाढवली, नवे नियम काय?

जर एका बँकेच्या ग्राहकाने दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून त्याचे कार्ड वापरून पैसे काढले, तर ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जातात, ती बँक एक व्यापारी बँक बनते.

RBI च्या निर्देशानंतर बँकांनी इंटरचेंज फी वाढवली, नवे नियम काय?
Cash Withdrawal
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 10:56 AM

नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आदेशानंतर बँकांनी एटीएम मशीनवरील प्रत्येक व्यवहारावर आकारण्यात येणारे इंटरचेंज शुल्क 1 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून वाढवले. इंटरचेंज फी म्हणजे बँकांकडून क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट प्रक्रिया करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आकारले जाणारे शुल्क आहे. जर एका बँकेच्या ग्राहकाने दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून त्याचे कार्ड वापरून पैसे काढले, तर ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जातात, ती बँक एक व्यापारी बँक बनते.

RBI च्या निर्देशानुसार इंटरचेंज फी 2 रुपयांनी वाढवली

RBI च्या निर्देशानुसार इंटरचेंज फी 2 रुपयांनी वाढवली आहे. जूनमध्ये मध्यवर्ती बँकेने इंटरचेंज फी 15 रुपयांवरून 17 रुपये केली. तर बिगर आर्थिक व्यवहारांचे शुल्क 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आले. हे नियम आजपासून लागू केले जात आहेत.

फी वाढवण्याची कारणे

एटीएम मशीनच्या वाढत्या खर्चामुळे आणि बँकांकडून होणाऱ्या एटीएमच्या देखभालीच्या खर्चामुळे हे शुल्क वाढण्यास परवानगी देण्यात आली होती. आरबीआयने गठित केलेल्या समितीच्या सूचनांच्या आधारे जून 2019 मध्ये बदल जाहीर करण्यात आले. इंडियन बँक्स असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एटीएम शुल्क आणि शुल्काच्या संपूर्ण श्रेणीचा आढावा घेण्यासाठी हे स्थापित केले गेले. दरम्यान, एटीएम व्यवहारांसाठी इंटरचेंज संरचनेवर विशेष लक्ष दिले गेले.

जाणून घ्या किती व्यवहार मोफत असतील?

सुधारित नियमांनुसार, ग्राहक त्यांच्या होम बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच मोफत व्यवहार करू शकतील. त्याच वेळी तुम्ही इतर बँकांच्या एटीएममधून मोफत व्यवहार करण्याचा दावा देखील करू शकता. त्यानंतर त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. महानगरांमध्ये राहणाऱ्यांना तीन विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी दिली जाईल. तर मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये तुम्ही पाच वेळा विनामूल्य पैसे काढण्याचा लाभ घेऊ शकाल.

ग्राहक शुल्कही वाढेल

ग्राहक शुल्काची मर्यादा सध्या 20 रुपये प्रति व्यवहार आहे, जी 1 जानेवारी 2022 पासून वाढवून 21 रुपये केली जाईल. बँका अधिक इंटरचेंज शुल्क आणि खर्चात सामान्य वाढ भरून काढण्यासाठी बँकांना लक्षात घेऊन आरबीआयने बँकांना प्रति व्यवहार ग्राहक शुल्क वाढवण्याची परवानगी दिली आहे. ही वाढ 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.

संबंधित बातम्या

LPG Gas Cylinder Price: 73.5 रुपयांनी महागला एलपीजी गॅस, पटापट तपासा नवे दर

PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता एकाच ATM मधून 3 खात्यांचे पैसे काढता येणार

interchange fee hike from-today 1 august 2021 now banks can charge on atm transactions

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.