आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा श्रीलंकेला फटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या भारतात काय स्थिती?

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा 19 वा दिवस आहे. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाल्याचे दिसून येत आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीमध्ये सातत्याने चढ -उतार होत असल्याचे पहायल मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा श्रीलंकेला फटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या भारतात काय स्थिती?
कच्च्या तेलाची आयात वाढली
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 9:01 AM

Petrol Diesel Rates : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा 19 वा दिवस आहे. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाल्याचे दिसून येत आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीमध्ये सातत्याने चढ -उतार होत असल्याचे पहायल मिळत आहे. कच्च्या तेलाने प्रति बॅरल 100 डॉलरचा टप्पा कधीच पार केला आहे. अशा सर्व अनिश्चित वातावरणात आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले. आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कच्च्या तेलाचे वाढत असलेले दर पाहाता पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल डिझेलचे दर वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र निवडणूक निकालाच्या चौथ्या दिवशी देखील भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत असलेल्ये कच्च्या तेलाच्या किमतीचा मोठा फटका हा श्रीलंकेला बसला आहे. गेल्या काही दिवसांत श्रीलंकेत पेट्रोल, डिझेलचे दर तब्बल 15 टक्क्यांनी वाढले आहेत.

प्रमुख शहरातील इंधनाचे दर

ओसीएलकडून प्राप्त माहितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रती लिटर 95.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 86.67 रुपये एवढा आहे. मुंबत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 व 94.14 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रलसाठी 104.67 रुपये आणि डिझेलसाठी 89.79 रुपये आकारले जात आहेत. तर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 101.40 रुपये तर डिझेलचा दर 91.43 रुपये एवढा आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या

रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे दर 120 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे पोहोचले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने पेट्रल, डिझेलची दरवाढ अटळ मानली जात आहे. पाच राज्यातील निवडणुका होताच दर वाढविले जातील असा अंदाज होता. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज चौथ्या दिवशी देखील इंधनाच्या किमती स्थिर आहेत.

संबंधित बातम्या

टेलिकॉम क्षेत्राचे रुपडे पलटणार; ‘5G’बाबत माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले वैष्णव?

Russia-Ukraine war : भारतीय स्टील उद्योगाची चांदी; निर्यात 76 टक्क्यांनी वाढली

पैसे गुंतवणुकीचा सोपा मार्ग ! अधिक परताव्यासह सुरक्षेची हमी; पोस्टाच्या ‘या’ योजनेबद्दल तुम्हाला माहितीये का?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.