Women’s Day 2021: फक्त महिला अधिकाऱ्यांनाच मिळणार नोकरी, ‘या’ कंपनीची मोठी घोषणा
महिला दिनानिमित्त, भारतातील सर्वात मोठी एकात्मिक उर्जा कंपनी एनटीपीसी लिमिटेडने (NTPC Ltd.) आपल्या कार्यक्षेत्रात विशेष महिला भरती मोहिमेच्या रूपात केवळ महिला अधिकारी भरती करण्याची योजना जाहीर केली, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
नवी दिल्ली : सरकारी विद्युत कंपनी एनटीपीसीने NTPC (National Thermal Power Corporation) महिला दिनाच्या एक दिवस आधी महिला अधिकाऱ्यांसाठी विशेष भरती मोहीम जाहीर केली होती. महिला दिनानिमित्त, भारतातील सर्वात मोठी एकात्मिक उर्जा कंपनी एनटीपीसी लिमिटेडने (NTPC Ltd.) आपल्या कार्यक्षेत्रात विशेष महिला भरती मोहिमेच्या रूपात केवळ महिला अधिकारी भरती करण्याची योजना जाहीर केली, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. (international womens day 2021 ntpc recruitment for women know the details here)
कंपनीच्या निवेदनानुसार, ही भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी आहे आणि आता ही कंपनी महिला शक्ती आणखी मजबूत करेल. अशा भरती मोहिमेमुळे एनटीपीसीमध्ये लैंगिक विविधता वाढेल.
अर्ज फी केली माफ पूर्णपणे
एनटीपीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकाधिक महिला अर्जदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून पुढाकार घेण्यात आला आहे. भरतीच्या वेळी महिला कर्मचाऱ्यांसाठी अर्ज फी पूर्णपणे माफ केली गेली आहे. महिला कर्मचार्यांना पाठिंबा देण्यासाठी एनटीपीसी मुलांची देखभाल वेतन, प्रसूती रजा, विश्रांती रजा अशा धोरणांचं पालन करते.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक केमिस्ट (NTPC Recruitment 2021) च्या पदांसाठी अर्ज मागितले आहेत. अर्ज करण्यासाठी अजून तीन दिवस शिल्लक आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही ते एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाइट ntpc.co.in किंवा ntpccareers.net वर भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2021 पर्यंत आहे. (international womens day 2021 ntpc recruitment for women know the details here)
संबंधित बातम्या –
International Women’s Day : SBI ग्राहकांना मोठी संधी, महिलांसाठी मिळणार खास योजना
डब्यात पैसे साठवणाऱ्या महिला आज म्युच्युअल फंड आणि स्टॉक्समध्ये खेळतात, पुरुषांनाही ‘असं’ टाकलं मागे
International Women’s Day! महिलांनो अडचणीत असाल तर ‘या’ नंबरवर करा फोन, सरकारची मोठी योजना
(international womens day 2021 ntpc recruitment for women know the details here)