LIC Micro Bachat : या योजनेत करा गुंतवणूक, केवळ 10320 रुपयांच्या प्रीमियमवर मिळेल 2 लाखांचे हमी रिटर्न्स
विमाधारकास या योजनेवर कर्जाची सुविधादेखील मिळते. ही योजना एलआयसीने कमी उत्पन्न-गटांसाठी बनविली आहे. (invest in LIC's micro bachat policy and get above 2 lakh return)
मुंबई : जर तुम्हाला बचत योजनेत पैसे गुंतवायचे असतील, मात्र आपले उत्पन्न कमी आहे. तर काळजी कर नका. जीवन विमा महामंडळाने कमी उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांसाठी एक पारंपारिक नॉन लिंक्ड मायक्रो इन्शुरन्स प्लान आणला आहे. या बचत योजनेत विमाधारकाला दुप्पट संरक्षण मिळते, जे बचत स्वरुपातही असते. जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी कालावधीत मृत्यू झाला तर ते नॉमिनीला आर्थिक पाठबळ देते. जर पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत जिवीत राहिला तर सम अॅश्युअर्ड मिळेल. याशिवाय विमाधारकास या योजनेवर कर्जाची सुविधादेखील मिळते. ही योजना एलआयसीने कमी उत्पन्न-गटांसाठी बनविली आहे. (invest in LIC’s micro bachat policy and get above 2 lakh return)
एलआयसीची ही फार जुनी योजना नाही. या योजनेत विमाधारकास मॅच्युरिटी बेनिफिटसह सरेंडर बेनिफिट मिळते. तथापि, 5 वर्षांचे प्रीमियम जमा करणे आवश्यक आहे. पॉलिसी कार्यरत असल्यास, एकूण प्रीमियम ठेवीच्या 70 टक्के पर्यंत कर्ज मिळते. कर्जाचा व्याज दर 10.42 टक्के आहे. याशिवाय प्रीमियम जमा केल्यास कलम 80 सी अंतर्गत डिडक्शनचा लाभ मिळतो.
एलआयसी मायक्रो बचतचे फायदे
या योजनेत, विमाधारकास बरेच फायदे मिळतात. पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर मॅच्युरिटी बेनिफिट दिले जाते. याशिवाय लॉयल्टी अॅडिशन्स देखील उपलब्ध आहे. दरवर्षी एलआयसी निर्णय घेते. जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर जमा झालेल्या प्रीमियमच्या 105 टक्के डेथ बेनिफिट स्वरुपात मिळतील. लॉयल्टी अॅडिशन्सचा लाभ पॉलिसीची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळेल.
एलआयसी मायक्रो बचतसाठी पात्रता
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी विमाधारकाचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे आहे. किमान विमा रक्कम 50 हजार आणि कमाल 2 लाख रुपये आहे. पॉलिसीची मुदत 10 वर्षे ते 15 वर्षे आहे. प्रीमियम पेमेंट टर्म पॉलिसी टर्मएवढीच आहे. कमाल मॅच्युरिटी वय 70 वर्षे आहे. म्हणजेच 55 वर्षांची व्यक्ती जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी पॉलिसी घेऊ शकते. पॉलिसीसाठी जास्तीत जास्त रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही.
प्रीमियम कॅल्युलेशन
समजा एखाद्या व्यक्तीचे 25 वर्षे आहे आणि त्याने 2 लाख रुपयांचा सम अश्युअर्डवाला प्लान 15 वर्षांसाठी घेतला आहे. यासाठी वर्षाला 10320 (51.60*200000/1000) रुपये प्रीमियम अमाऊंट भरावे लागले. या पॉलिसीची प्रीमियम अमाऊंट किमान 2524 रुपये आणि कमाल 17612 रुपयांपर्यंत असेल. (invest in LIC’s micro bachat policy and get above 2 lakh return)
‘डोक्यावर बंदूक ठेऊन ट्रिगर दाबलं आणि जोरजोराने हसले’, आधी रोसेन, आता नाजनीन, इराणच्या तुरुंगातील छळाच्या घटनाhttps://t.co/lTupLwqCso#Iran #Torture #BarryRosen #America
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2021
इतर बातम्या
चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत 3.3 टक्के घट, व्यापार तूट कमी करण्यास मदत