गुंतवणूक करण्याचे अनेक प्रकार आहेत. बरेच लोक चांगला परतावा मिळावा यासाठी जोखीम घेण्यास तयार असतात. पण काहींना मात्र कमी उत्पन्न मिळालं तरी चालेल पण जोखीम घ्यायची नसते. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदारासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये आहेत. जिथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकता.
खरंतर, कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. या साथीच्या रोगाने संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेला धक्का बसला. इतकंच नाही तर काही लोक अजूनही शेअर बाजाराता गुंवतणूक करण्यासाठी घाबरत आहेत. पण आता कुठे सगळं काही पुर्वपदावर येत आहे.
यामुळे नवीन वर्षात कुठे गुंतवणूक करावी, कुठे पैसा सुरक्षित असेल आणि परतावा चांगला मिळेल? याच्या शोधात सगळे आहेत. आम्ही तुम्हाला गुंतवणूकीचे असेच 5 मार्ग सांगणार आहोत. जिथे तुम्ही चांगली गुंतवणूक करून अधिक नफा मिळवू शकता.
शेअर बाजारातील गुंतवणूक : जर काही प्रमाणआत धोका पत्करण्यासाठी तुम्ही तयार असाल तर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता. जास्त कालावधीत गुंतवणूकदारांना स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची सध्या चांगली संधी बाजारात उपलब्ध आहे.
कोरोनाचा धोका कुठेतरी कमी होताना दिसत आहे. यामुळेच म्युच्युअल फंडामध्ये आणखी तेजी दिसून येत आहे. अशात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असता चांगलं उत्पन्न मिळेल. इतकंच नाही तर मागच्या वर्षी 20 वर्षात गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडामधून भरभक्कम नफा मिळवला आहे.
सोन्यामध्ये गुंतवणूक : कोरोना संकटाच्या गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचं पाहायला मिळालं. खरंतर, जेव्हा-जेव्हा आर्थिक मंदी येते तेव्हा नेहमीच सोन्यात गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय आहे. आताच्या परिस्थितीत सोनं उच्च पातळीपेक्षा 10 टक्क्यांहून जास्त आहे. पण गेल्या एका वर्षात सोन्याने 30 टक्क्यांहून अधिक परतावा दिला होता.
सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक : गुंतवणूक करण्यासाठी पीपीएफसह अनेक सरकारी गुंतवणूकीचे पर्याय आहेत. ज्यामध्ये तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करून ठेवींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकता. इतकंच नाही तर दरमहा पोस्ट ऑफिसमध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता.
जर तुमच्या घरात दहा वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी असेल तर तुम्ही तिच्या नावावर सुकन्या समृद्धि योजनेत गुंतवणूक करू शकता. मोदी सरकारची ही योजना चांगला परतावा देते.
कमी पैशात अधिक फायदा