‘या’ योजनेत एकदाच पैसे गुंतवा आणि दरवर्षी 1.1 लाख रुपये मिळवा, असा घ्या फायदा

वृद्धांना त्यांच्या आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरू केली गेली.

'या' योजनेत एकदाच पैसे गुंतवा आणि दरवर्षी 1.1 लाख रुपये मिळवा, असा घ्या फायदा
दरमहा 42 रुपये जमा करा आणि मिळवा 1000 रुपये मासिक पेन्शन
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 10:36 AM

नवी दिल्लीः PM Vaya Vandana Yojana: ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान वय वंदना योजनेंतर्गत (PM Vaya Vandana Yojana) 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 1,11,000 पर्यंत पेन्शन मिळू शकते. या योजनेचा कालावधी 31 मार्च 2020 पर्यंत होता, परंतु ती मार्च, 2023 पर्यंत वाढविण्यात आली. वृद्धांना त्यांच्या आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरू केली गेली.

60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक त्यात गुंतवणूक करू शकतात

योजनेत सामील होण्यासाठी किमान वय 60 वर्षे आहे. म्हणजेच 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक त्यात गुंतवणूक करू शकतात. वयाची कोणतीही कमाल मर्यादा नाही. या योजनेत एक व्यक्ती जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते. या योजनेच्या संचालनाची जबाबदारी जीवन विमा महामंडळाकडे (LIC) सोपविण्यात आलीय. या योजनेतील निवृत्तीवेतनासाठी एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल. लाभार्थी मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शनसाठी निवडू शकतात.

1.1 लाख रुपये वार्षिक पेन्शन उपलब्ध असेल

या योजनेंतर्गत दरमहा 1000 रुपये पेन्शनसाठी 1.62 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त मासिक पेन्शन 9,250 रुपये, तिमाही पेन्शन 27,750 रुपये, सहामाही पेन्शन 55,500 रुपये आणि वार्षिक पेन्शन 1,11,000 रुपये आहे.

गुंतवणूक कशी करावी?

>> PMVVY योजनेच्या अधिक तपशीलांसाठी आपण 022-67819281 किंवा 022-67819290 वर कॉल करू शकता. आपण टोल-फ्री क्रमांक 1800-227-717 डायल देखील करू शकता. >> पीएम वय वंदना योजना सेवा कर आणि जीएसटीमधून सूट देण्यात आलीय. कोणत्याही गंभीर किंवा असाध्य रोग किंवा जोडीदाराच्या उपचारांसाठी अकाली पैसे काढण्याची परवानगी आहे. >> प्रधानमंत्री वय वंदना योजनेतील गुंतवणुकीसाठी तुम्हाला पॅनकार्डची प्रत, पत्त्याच्या पुराव्याची प्रत आणि बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत फॉर्मसह जमा करावी लागेल. >> पॉलिसीच्या 3 वर्षांनंतर पीएमव्हीव्हीवाय वर कर्ज सुविधा उपलब्ध असते. कमाल कर्जाची रक्कम खरेदी किमतीच्या 75% पेक्षा जास्त असू शकत नाही. सरकारच्या इतर पेन्शन योजनांप्रमाणे या योजनेत कर लाभ देण्यात येत नाही.

संबंधित बातम्या

तुम्ही PPF खात्यातर्फे बचत करता? एसबीआयने सांगितले, कधी काढू शकता तुमचे पैसे?

कोल इंडियासह दिग्गज कंपन्यांना पछाडत झोमॅटोचा रेकॉर्ड, IPO तून जबरदस्त कमाई

Invest once in pm vaya vandana yojana scheme and earn Rs 1.1 lakh per annum

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.