SIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती पैसे लावावे लागतात?
तुम्हाला तुमचा दैनंदिन खर्च सांभाळून हळूहळू गुंतवणूक वाढवत नेऊन भविष्य सुरक्षित करायचं असेल तर त्यासाठी एसआयपी (SIP) उत्तम पर्याय आहे.
मुंबई : तुम्हाला तुमचा दैनंदिन खर्च सांभाळून हळूहळू गुंतवणूक वाढवत नेऊन भविष्य सुरक्षित करायचं असेल तर त्यासाठी एसआयपी (SIP) उत्तम पर्याय आहे. तुम्ही दैनंदिन खर्चात बचत करुन हळूहळू दरवर्षी एका विशिष्ट प्रमाणात गुंतवणूक वाढवू शकता. अखेरीस तुम्हाला त्याचा चांगला परतावा मिळतो. यानुसार तुम्ही वर्षाला निश्चित रक्कम वाढवू शकता किंवा मासिक गुंतवणुकीत छोटी रक्कम वाढवू शकता. ही रक्कम 10 ते 20 टक्के देखील असू शकते (Investing of 5000 rupees per month in SIP for 15 years gives 26-lakh return).
किती रुपये गुंतवल्यास चांगली कमाई
एसआयपीमध्ये किती रुपये गुंतवल्यास चांगला परतावा मिळतो हे जाणून घेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्ही एसआयपीमध्ये प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये गुंतवले. ही एसआयपी 15 वर्षांपर्यंत सुरू ठेवल्यास 12 टक्के व्याजाप्रमाणे परतावा मिळतो. याप्रमाणे 15 वर्षांनंतर तुमचा फंड 26 लाख रुपये होईल. महिन्याची 5 हजार किंवा दिवसाची जवळपास 165 रुपये गुंतवणूक 15 वर्षांनंतर 26 लाख रुपयांमध्ये रुपांतरीत होईल.
दरवर्षी 5 टक्के एसआयपी रक्कम वाढवल्यास 32 लाख रुपयांचा परतावा
जर प्रत्येक वर्षी 5 टक्के एसआयपीची रक्कम वाढवली तर 15 वर्षांनंतर ही रक्कम 32 लाख रुपये होते. याचा अर्थ तुमची एसआयपी पहिल्या वर्षी 250 रुपये, दुसऱ्या वर्षी 262 रुपये आणि तिसरे वर्षी 275 रुपयांनी वाढत जाईल. यात दरवर्षी तुम्ही थोडी थोडी रक्कम वाढवल्यानं तुमच्या आर्थिक नियोजनावरही ताण येत नाही.
हेही वाचा :
45 व्या वर्षापर्यंत 5 कोटी रुपयांची बचत हवीये? SIP मध्ये किती गुंतवणूक कराल?
SIP ची भन्नाट योजना, 3 लाखांची गुंतवणूक करा आणि 11 लाख कमवा
Investment tips : 5 वर्षात रक्कम डबल, SIP सुरु करण्यासाठी 5 चांगल्या योजना
व्हिडीओ पाहा :
Investing of 5000 rupees per month in SIP for 15 years gives 26-lakh return