लाखभर पगार असूनही बचत शून्य, जाणून घ्या गुंतवणूकीच्या सोप्या टिप्स
जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा स्वत:चा व्यवसाय असेल तर ही समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे किमान तीन बँक अकाऊंट असणे आवश्यक आहे. (Tips To Manage Your Monthly Salary)
मुंबई : सध्या पैसे कमावण्यासोबतच त्याची बचत करणेही महत्त्वाचे आहे. पण अनेकदा पगार किंवा उत्पन्न कमी असेल तर बचत करणे अवघड असते, पण अशक्य नाही. तर काही लोकांना चांगला पगार मिळाल्यानंतरही बचत करता येत नाही. पगार आल्यानतंर तो कधी संपतो हेच कळत नाही, मग त्याची बचत कशी करु? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Investment Advice Tips To Manage Your Monthly Salary)
सध्या महागाईच्या काळात भविष्यासाठी बचत, खर्च आणि गुंतवणूक यांच्यात समतोल असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या तिघांचा ताळमेळ व्यवस्थित बसवला, तर तुम्ही आर्थिक घडी बसवण्यात यशस्वी होऊ शकता. अनेकांचा पगार फार जास्त असतो. पण त्यांचे पैसे नेमके कुठे खर्च होतात, हेच त्यांना कळत नाही. अशावेळी समतोल राखणे गरजेचे असते.
?पैसे कुठे खर्च होतात?
जर तुमचा महिन्याचा पगार नेमका कुठे खर्च होतो हेच तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे आर्थिक नियोजन योग्य नाही, असे समजले जाते. अनेकांकडून खर्चाची यादी नसते. आज आम्ही आपल्याला बचत, खर्च आणि गुंतवणूकीबद्दल तपशीलवार सांगणार आहोत. विशेष म्हणजे या तिन्ही गोष्टींचा थेट संबंध हा तुमच्या बँक खात्याशी येतो.
जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा स्वत:चा व्यवसाय असेल तर ही समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे किमान तीन बँक अकाऊंट असणे आवश्यक आहे.
?पहिले अकाऊंट : जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा दर महिन्याचा पगार हा बँक खात्यात जमा होत असेल. तसेच जर तुमचा व्यवसाय असेल तर तुमच्याकडे चालू खाते असणे आवश्यक आहे. तुमच्या सॅलरी अकाऊंटला इन्कम अकाऊंट असे समजा. त्यानुसार तुम्हाला पगाराव्यतिरिक्त जे काही उत्पन्न येते ते दर महिना याच खात्यात जमा करा. त्यामुळे तुमचे महिन्याचे नेमकं उत्पन्न किती याचा अंदाज येईल.
?दुसरे अकाऊंट : जेव्हा तुम्हाला महिन्याच्या उत्पन्नाचा अंदाज येईल, त्यानंतर तुम्ही तुमच्या खर्चासाठीचा पैसा दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करा. त्यामुळे दुसऱ्या अकाऊंटचा उपयोग हा spend account म्हणून केला जाऊ शकतो. या खात्यात तुमची दरमहिना किती रक्कम खर्च होते, तुमचा नेमका खर्च किती याचा अंदाज तुम्हाला कळतो. त्यानुसार तुम्ही गरजेनुसार खर्च करु शकता.
?तिसरे अकाऊंट : जेव्हा आपण बचत आणि खर्च दरम्यान शिल्लक ठेवता ते तुमचे गुंतवणूकीच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असते. म्हणजेच पहिल्या खात्यात खर्च केलेल्यानंतर शिल्लक असलेली रक्कम तुम्ही गुंतवू शकता. पण ही गुंतवणूक करण्यासाठी वेगळ्या खात्याची गरज असते.
गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही दरमहा किती गुंतवणूक करणार आहात, हे ठरवा. ती रक्कम पहिल्या बँक खात्यातून थेट तिसर्या बँक खात्यात अर्थात गुंतवणूक खात्यात ट्रान्सफर करा. त्यानंतर ती रक्कम गुंतवा. दरम्यान सुरुवातीला गुंतवणूक करताना ती मोठ्या प्रमाणात करु नका. यामुळे तुमचे बजेट गडबडू शकते. पगार वाढल्यानंतर गुंतवणूकीच्या रक्कमेत वाढ करा.
यानुसार प्रत्येक व्यक्तीकडे तीन बँक अकाऊंट असले पाहिजेत. यात पहिले खाते हे उत्पन्नाचे असेल. दुसरे हे महिनाभराच्या खर्चासाठीचे आणि तिसरे हे गुंतवणुकीसाठीचे असेल. जर तुम्ही दर महिना हा नियम पाळलात तर तुमची तक्रार दुरु होईल. तसेच तुमचे पैसे नेमके कुठे खर्च झाले याचाही तुम्हाला अंदाज लावता येईल. (Investment Advice Tips To Manage Your Monthly Salary)
संबंधित बातम्या :
SBI ग्राहकांसाठी अलर्ट, आता बँकेत फक्त ‘ही’ चार कामं करता येणार
मॅनेजमेंट बदलताच ‘या’ कंपनीचे शेअर होल्डर्स मालामाल, एका शेअरची किंमत 100 रुपयांहून कमी
हॉलमार्किंग म्हणजे काय? सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी कसा फायदा? जाणून घ्या