Post Office Scheme: अवघ्या 5 वर्षात मिळणार 21 लाख, 100 रुपयांनी सुरू करू शकता गुंतवणूक

अचानक कधी पैशांची गरज भासते हे सांगणं कठीण आहे. पण यासाठी उत्तम पर्याय म्हणजे आतापासूनच गुंतवणूक आणि बचत करण्यास सुरुवात केली पाहिजे.

Post Office Scheme: अवघ्या 5 वर्षात मिळणार 21 लाख, 100 रुपयांनी सुरू करू शकता गुंतवणूक
पोस्ट ऑफिसच्या मासिक बचत योजनेमध्ये (MIS) तुम्ही एकाच खात्यामधून 1000 ते साडेचार लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. जर तुमचं जॉईंट खातं असेल तर जास्तीत जास्त पैशांची मर्यादा 9 लाख रुपयांपर्यंत आहे.
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 9:54 AM

Post Office National Savings Certificate Scheme: कोरोनाचा कठीण काळ पाहिल्यानंतर एखादी छोटी बचत जरी केली तरी ती भविष्यासाठी महत्त्वाची आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गामुळे प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंत आहे. अचानक कधी पैशांची गरज भासते हे सांगणं कठीण आहे. पण यासाठी उत्तम पर्याय म्हणजे आतापासूनच गुंतवणूक आणि बचत करण्यास सुरुवात केली पाहिजे. तुम्हालाही जर बचत करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. (investment idea post office schemes national saving certificate benefits and get bumper return)

तुमच्या उत्पन्नातून होणारी बचत हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट पर्याय (Best Investment Plans) आहे. मार्केमध्ये सध्या खासगी आणि सरकारी (Government Schemes) अशा असंख्य योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही कमी गुंवणुकीवर चांगला नफा मिळू शकतो

प्रत्येकजण आपल्या पैशांची बचत करता यावी यासाठी प्रयत्नात आहे. अशात पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) गुंतवणूक एक उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना (Post Office Schemes) आहेत जिथं तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. यापैकी एक योजना म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (Post Office NSC). ही एक उत्तम पोस्ट ऑफिस योजना आहे.

काय आहेत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचे फायदे?

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत तुम्ही फर्त अल्प प्रमाणात गुंतवणूक करू शकता आणि काही वर्षांत चांगला नफा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं खातं पूर्णपणे सुरक्षित असल्याने, अशा परिस्थितीत आपण कोणत्याही जोखीमशिवाय इथं गुंतवणूक करू शकता. या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेची मुदतपूर्ती 5 वर्षे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वाच्या गरजांसाठी तुम्ही अटी आणि नियमांचं पालन करत 1 वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीनंतरही तुमची रक्कम काढू शकता. आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीच्या सुरूवातीस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील व्याज दर सरकार ठरवते.

6.8 टक्के आहे वार्षिक व्याज दर

ही योजना इतकी खास आहे की यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांनीही गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेंतर्गत दरवर्षी 6.8 टक्के व्याज दिलं जातं. खास गोष्ट म्हणजे या योजनेत आयकर कलम 80Cसी अंतर्गत तुम्हाला वर्षाकाठी दीड लाख रुपयांची कर सूट देखील मिळू शकते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 100, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 आणि 10,000 रुपयांचे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीलाही मर्यादा नाही. या योजनेत सुरुवातीला पैसे मोजावे लागतात सुरुवातीला तुम्ही 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.8 टक्के व्याज मिळेल. म्हणजेच 5वर्षानंतर तुम्हाला 20.85 लाख रुपये म्हणजे 21 लाख रुपये मिळतील.

पोस्ट ऑफिस बचत योजनांवर सध्या व्याज दर

– बचत खाते – बचत ठेवीवर: 4%

– 1 ते 3 वर्षांच्या वेळेच्या ठेवीवर: 5.5 टक्के

– 5 वर्षांच्या मासिक पगाराच्या खात्यावर: 6.6 टक्के

– 5 वर्षांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र: 6.8 टक्के

– किसान विकास पत्रावर: 6.9 टक्के

– चालू खाते (-वर्षाच्या रेकॉर्डिंग ठेवीवर): 8.8%

– 5-वर्षाच्या वेळेवर ठेव: 6.7 टक्के

– ज्येष्ठ नागरिक – 5 वर्षे बचत खाते: 7.4%

– सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर: 7.1 टक्के

– सुकन्या समृद्धि खाते: 6.6%

(investment idea post office schemes national saving certificate benefits and get bumper return)

संबंधित बातम्या –

कमी पैशात PNB मध्ये करा सुरक्षित गुंतवणूक; एकाच खात्यामध्ये आकर्षक व्याज, कर्जाची सुविधा

केंद्र सरकारच्या बजेटपेक्षाही जास्त आहे देशाच्या ‘या’ तीन कंपन्यांची संपत्ती!

Special Story : कमी वेळेत गुंतवणुकीचे असे 6 पर्याय ज्यातून बक्कळ कमवाल

(investment idea post office schemes national saving certificate benefits and get bumper return)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.