Investment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत

व्यावसायिक जगात पाऊल ठेवल्यापासूनच बचत करायला सुरुवात करावी लागेल. जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी नोकरी किंवा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला दरमहा किमान 15,000 रुपये वाचवावे लागतील. ही बचत तुम्हाला 30 वर्षे करावी लागेल, म्हणजेच तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर सेवानिवृत्तीच्या जगात प्रवेश करत असाल, तेव्हा तुमच्याकडे 5 कोटींहून अधिक रक्कम जमा झालेली असेल.

Investment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 12:11 PM

नवी दिल्लीः Money Making Tips: प्रत्येकाला स्वतःचे घर, कार आणि पुरेसा बँक बॅलन्स हवा असतो, जेणेकरून कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करता येतील आणि त्यांचे स्वतःचे आयुष्य देखील सुखकर होईल. देशातील आणि जगातील सर्व श्रीमंतांबद्दल आपण वाचतो आणि त्यांच्यासारखे होण्याची स्वप्नेसुद्धा पाहतो. पण सचर्व श्रीमंत लोक फक्त अचानक श्रीमंत झालेले नसतात, तर त्यांच्यामागे त्यांचे खूप कष्ट असतात. त्यामागे त्यांची मेहनत आणि वर्षानुवर्षांची खास रणनीती असते.

…तर तुम्हीसुद्धा करोडपती बनू शकता

दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे करोडपती होणे, घराचा खर्च उचलणे कठीण झालेय. पण या कठीण काळातही तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता. तुम्हीसुद्धा करोडपती बनू शकता. पण करोडपती होण्यासाठी काही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. तज्ज्ञांचे मत आहे की, श्रीमंत होण्याचा पहिला मंत्र म्हणजे बचत करणे आणि अधिक बचत करणे आहे. योग्य वेळी बचत करणे आणि संपत्ती जमा करणे यात थेट संबंध असतो. श्रीमंत होण्यासाठी अशाच काही कल्पनांची चर्चा करत आहोत. जर तुम्ही वेळेवर आणि शिस्तीने या मंत्रांचे पालन केले तर तुम्ही नक्कीच करोडपती होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.

फक्त बचत आणि बचत (Money Saving Tips)

तुम्हाला बचत करायची असल्यास लवकर सुरू करावी लागेल. व्यावसायिक जगात पाऊल ठेवल्यापासूनच बचत करायला सुरुवात करावी लागेल. जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी नोकरी किंवा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला दरमहा किमान 15,000 रुपये वाचवावे लागतील. ही बचत तुम्हाला 30 वर्षे करावी लागेल, म्हणजेच तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर सेवानिवृत्तीच्या जगात प्रवेश करत असाल, तेव्हा तुमच्याकडे 5 कोटींहून अधिक रक्कम जमा झालेली असेल. आर्थिक तज्ज्ञांनी ही बचत वार्षिक 12 टक्के परतावा मानलीय. तुम्ही तुमच्या बचतीला जितका उशीर कराल तितका तुम्हाला बचतीचा भाग वाढवावा लागेल. जर गुंतवणूक सुरू होण्यास 10 वर्षांचा विलंब झाला, तर तीच बचत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये प्रति महिना करावी लागेल. होय, ही बचत नियमित असावी हे लक्षात ठेवा. यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये.

सर्वोत्तम पैसे बचत आयडिया

तुम्ही दर महिन्याला बचत करण्यास सुरुवात केली आणि नियमितपणे बचत करत आहात. आता ही बचतही दरवर्षी वाढवावी लागणार आहे. तुमची मासिक बचत महागाई आणि तुमचे उत्पन्न वाढेल त्याच प्रमाणात वाढवावी लागेल. वार्षिक बचतीची रक्कम वाढवून तुम्ही लवकरच करोडपती होण्याचे तुमचे ध्येय साध्य करू शकता. याशिवाय बचत वाढवून तुम्ही वाढत्या महागाईवरही नियंत्रण ठेवू शकाल. SIP मध्ये स्टेप अप तुमच्या गरजेनुसार आहे. दरवर्षी 10% रक्कम वाढवणे आवश्यक नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बचत पाच टक्क्यांनीही वाढवू शकता.

गुंतवणूक टिप्स

जर तुम्ही बचत करत असाल पण ती योग्य ठिकाणी गुंतवली नाही, तर तुमची मेहनत व्यर्थ जाईल. पै अन् पै जोडून तुम्ही स्वप्नांचा महाल बांधत आहात, पण चुकीच्या गुंतवणुकीमुळे हा महाल एका झटक्यात कोसळू शकतो, असे होऊ नये. त्यामुळे बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास उत्तम परतावा मिळण्याची अपेक्षा जास्त असते. पोर्टफोलिओ अगदी साधा ठेवा. खूप जास्त उत्पादने समाविष्ट करून तुमचा पोर्टफोलिओ क्लिष्ट करू नका. गुंतवणुकीची शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. दीर्घकालीन एसआयपी सुरू करा. नियमित अंतराने पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करा. बाजारातील तज्ज्ञांच्या मदतीने वेळोवेळी तुमच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करा.

खर्चावर नियंत्रण

बचतीमुळे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या कष्टाचे पैसे अनावश्यक खर्च करणे टाळा. दिसण्यापेक्षा सोयीची जीवनशैली अंगीकारावी लागते. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरणे टाळा. घरगुती खर्चासाठी नेहमी रोख रक्कम वापरा. बोनस किंवा अतिरिक्त मेहनतीनंतर मिळालेले पैसे घरखर्चासाठी इतरत्र गुंतवू नका.

इतर गरजांसाठी गुंतवणूक वापरणे टाळा

ज्या उद्दिष्टासाठी तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली, त्यासाठी त्याचा वापर करा. एका गुंतवणुकीचा वापर दुसऱ्या ध्येयासाठी करू नका. यामुळे तुम्हाला मुदतीपूर्वी पैसे काढावे लागतील आणि गुंतवणूक योग्य प्रकारे वाढू शकणार नाही. गुंतवणुकीचा क्रम मोडू नये म्हणून तुमची गुंतवणूक लॉक-इनच्या पर्यायामध्ये गुंतवावी लागेल, जेणेकरून तुम्हाला कितीही गरज असली तरी तुम्ही त्या गुंतवणुकीतून वेळेपूर्वी पैसे काढू शकत नाही.

आपत्कालीन निधी राखून ठेवा

आणीबाणीच्या काळात आपली बचतच कामी येते हे खरे आहे. परंतु कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, निश्चित लक्ष्यासाठी सुरू केलेली गुंतवणूक वापरू नका. अशा गरजांसाठी, तुम्हाला स्वतंत्र आपत्कालीन निधी ठेवावा लागेल. आपत्कालीन निधी तुम्हाला आपत्कालीन मदत देईल. तुमच्या नियमित मासिक खर्चानुसार, तुमच्याकडे किमान 6 महिन्यांचा आपत्कालीन निधी असावा.

संबंधित बातम्या

महत्त्वाची बातमी! 31 डिसेंबरपूर्वीच करा हे काम अन्यथा इतका दंड होणार

आपल्या कुटुंबातील वडिलधाऱ्यांच्या नावाने हे खाते उघडा, कर सवलतीचा लाभ; पैसाही सुरक्षित

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.