MTAR टेक्नॉलॉजीचा आयपीओ उघडला, IPO मध्ये गुंतवणूक करण्याची धमाकेदार संधी
आज मार्च महिन्यातला पहिला आयपीओ सुरू झाला आहे. एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा (MTAR Technologies) आयपीओ 3 मार्च रोजी उघडला आणि 5 मार्च रोजी बंद होणार आहे.
नवी दिल्ली : आज गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी आहे. वर्ष – 2021 मध्ये आयपीओमधून मोठी कमाई होणार असल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. खरंतर, गेल्या दोन महिन्यांत 8 कंपन्यांचे आयपीओ सुरू झाले आहेत. आज मार्च महिन्यातला पहिला आयपीओ सुरू झाला आहे. एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा (MTAR Technologies) आयपीओ 3 मार्च रोजी उघडला आणि 5 मार्च रोजी बंद होणार आहे. त्यामुळे यामध्ये गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. (make money investment tips mtar technologies ipo opens today ipo price band)
मीडिया रिपोर्टनुसार, 10 ते 16 कंपन्या मार्च महिन्यात आयपीओ सुरू करू शकतात. . गेल्या काही वर्षांत काही आयपीओ वगळता इतर सर्व गोष्टींमध्ये गुंतवणूकदारांनी पैसे कमावले. सगळ्यात महत्त्वाचं गेल्या वर्षी आयपीओमधून बक्कळ परतावा आला.
यामुळे गुंतवणूकदार आता MTAR टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची प्रतीक्षा करत आहेत. हैदराबादस्थित टेक कंपनी आयपीओद्वारे 596 कोटी रुपये जमा करणार आहे. कंपनीने आयपीओची किंमत बँड 574-575 रुपये निश्चित केली आहे. यामुळे गुंतवणूकदारास किमान 26 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. म्हणजेच 26 शेअर्सचा लॉट साईज आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, MTAR Technologies ची मोठी यादी जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आयपीओ ग्रे मार्केटवर बम्पर प्रीमियम मिळत आहे. ग्रे मार्केटमध्ये एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा आयपीओ 75 टक्के प्रीमियमवर व्यापार करत आहे. म्हणजेच ग्रे मार्केटमधील अनलिस्टेड शेअर्स इश्यूच्या किंमतीपेक्षा 430 रुपयांच्या वर 1005 रुपयांवर व्यापार करत आहेत.
खरंतर, आत्मनिर्भर भारतासाठी ज्या पद्धतीने देशात पावलं उचलली जात आहेत, त्याचा फायदा एमटीएआर टेक्नॉलॉजीजसारख्या कंपन्यांना होईल. (make money investment tips mtar technologies ipo opens today ipo price band)
संबंधित बातम्या –
gold rate : सलग सहाव्या दिवशी सोन्याचा भाव घसरला, वाचा आजचे ताजे दर
एकदाच लावा 50 हजार आणि सुरू करा बिझनेस, महिन्याला होईल 50 हजाराची कमाई
आता मोबाईल रिचार्ज करताच मिळेल Health Insurance, वाचा कंपनीचा खास प्लॅन
(टीप – कुठल्याही IPO किंवा योजनेमध्ये गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. )