OYOचा IPO लवकरच बाजारात, बीएसई, एनएसई मध्ये लवकरच समावेश, मंजुरी मिळाली

पर्यटन आणि हॉटेलसंबंधी नवीन दमदार कंपनी OYO चा IPO लवकरच बाजारात दाखल होत आहे. हा आयपीओ तब्बल 8,430 कोटींचा असेल. ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल या प्रकरणातील कोणताही हिस्सा विकणार नाहीत. त्यांचे एक तृतीयांशपेक्षा जास्त शेअर्स आहेत.

OYOचा IPO लवकरच बाजारात,  बीएसई, एनएसई मध्ये लवकरच समावेश, मंजुरी मिळाली
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 2:35 PM

देशभरात नावाजलेल्या ओयो (OYO) या कंपनीसोबत तुम्ही देशभरातील हॉटेल्समध्ये आगाऊ बुकिंग केले असेल. मनसोक्त पर्यटनाचा आनंदही लुटला असेल. आता कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला कमाईची संधी ही उपलब्ध झाली आहे. या कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात दाखल होत आहे. ओयोची (OYO) ट्रॅव्हल टेक कंपनीची मूळ कंपनी ओरावेल स्टेज लिमिटेडला बीएसई (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजकडून (NSE) सूचीबद्ध होण्यासाठी तत्त्वतः मान्यता मिळाली आहे, सूत्रांनी याविषयीची माहिती दिली. ओयोने 8, 430 कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक इश्यूसाठी (IPO) अर्ज केला आहे. या ऑफरमध्ये 7 हजार कोटी रुपयांचा नवा इश्यू आणि 1430 कोटी रुपयांपर्यंतची सेल ऑफर (OFS) देण्यात आली आहे. नुकतीच कंपनीला नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बीएसईमध्ये लिस्टेट कंपनींच्या नामावलीत जागा मिळाली आहे. याविषयीची परवानगी कंपनीला देण्यात आली आहे. ओयो हॉटेल्सला SoftBank चे समर्थन प्राप्त आहे आणि त्यांची हिस्सेदारी ४६ टक्के आहे.

पीटीआयला मिळालेल्या माहितीनुसार, आयपीओला मंजुरी मिळणार असताना शेअर बाजार त्यांना पुढे जाण्याची परवानगी देतात. अशा परिस्थितीत कंपनीला लवकरच बाजार नियामक सेबीची (SEBI) मान्यता मिळू शकते, असे संकेत यातून मिळत आहेत. सेबीची याविषयीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सुमारे 10 दिवसांत लिलावाची अंतिम फेरी अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी पीटीआयला दिली.

कंपनीने ऑक्टोबर महिन्यात याविषयीचा अर्ज सेबीकडे सादर केला होता. आयपीओच्या माध्यमातून कंपनी 8 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम उभारण्याची योजना आखत आहे. योजनेच्या प्रस्तावात कंपनीने इश्यूमधून जमा झालेल्या पैशांचा वापर कर्ज फेडण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी करणार असल्याची माहिती दिली आहे. ओयोची सध्या जगभरातील ३५ देशांतील १० हजार शहरांमध्ये सेवा आहे.

या प्रक्रियेनुसार, कंपनी अंतिम निरीक्षणाच्या अनुषंगाने अद्ययावत मसुदा सादर करेल आणि अंतिम प्रॉस्पेक्टसच्या मंजुरीची प्रतीक्षा करेल, त्याआधारे कंपनीला सार्वजनिक गुंतवणूकदारांशी औपचारिकपणे संपर्क साधण्यासाठी अंतिम दस्तऐवज तयार करता येईल आणि आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारता येईल.

नव वर्षाच्या दिवसाच्या बुकिंगमधून 110 कोटींची कमाई नववर्षाच्या दिवशी विक्रमी बुकिंग करण्यात आले असून यामुळे कंपनीने सप्ताहाच्या अखेरीस 110 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यंदाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने 10 लाखांहून अधिक लोकांनी 5 लाखांहून अधिक रात्रींसाठी रुम बुक केल्या, त्यामुळे कंपनीने न्यू इयर सेलिब्रेशन दरम्यान वीकेंडला एकट्या बुकिंगमधून 110 कोटी रुपये कमावले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,OYOचे संस्थापक रितेश अग्रवाल यांची कंपनीमध्ये थेट आणि त्यांच्या होल्डिंग कंपनीमार्फत (Holding Company) 33 टक्के भागीदारी आहे. या प्रक्रियेदरम्यान अग्रवाल यांचा हिस्सेदारी कमी करण्याचा विचार नाही. उलट ओयोतील प्रमुख गुंतवणुकदार SoffBank Vision Fund, ज्यांचा ओयोत 46 टक्के हिस्सा आहे, ते या योजनेत हिस्सेदारी 2 टक्क्यांनी कमी करणार आहे.

Investment Planning | डिव्हिडंड फंड की ग्रोथ फंड, दोघांमध्ये कोण आहे बेस्ट? जाणून घ्या!

Home Loan Tax Rebate: स्वप्नातील घराला कर सवलतीचा नजराणा, 5 लाखांपर्यंत मिळू शकते कर सवलत

पीएमसी इतिहासजमा; युनिटी स्मॉल फायनान्स बँकेशी ग्राहकांचे नवे नाते, विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.